Thursday, May 9, 2024
Homeमहत्वाची बातमीपाकिस्तानात आज मतदान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नवाज शरीफ पुढे

पाकिस्तानात आज मतदान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नवाज शरीफ पुढे

इस्लामाबाद: आर्थिक समस्या आणि दहशतवादी हल्ले यादरम्यान नव्या सरकार निवडीसाठी आज पाकिस्तानात मतदान होत आहे. इम्रान खान जेलमध्ये असल्याकारणाने मुख्य सामना नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग(एन) आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपुल्स पार्टी(पीपीपी) यांच्यात होत आहे. असे म्हटले जात आहे की नवाज शरीफ या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत ते चौथ्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसू शकतात. याचे कारण त्यांना सैन्याचे समर्थन आहे.

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बुधवारी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. बलुचिस्तान प्रांतात निवडणूक कार्यालयाला निशाणा बनवून करण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटात कमीत कमी ३० लोक मारले गेले तर ४० हून अधिक जखमी झाले.

शेजारील देश आधीच आर्थिक समस्यांनी त्रासलेला आहे. देशात वाढती बेरोजगारी, महागाईने गाठलेला कळस आणि आर्थिक संकटांनी लोकांचा त्रास अधिकच वाढला आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर चित्र सुधारेल अशी आशा तेथील नागरिक करत आहेत.

माजी पंतप्रधान तुरूंगात आहेत. याच कारणामुळे त्यांच्या पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. इम्रान यांच्या पक्षाचे नाव पाकिस्तान तहरीक ए इन्साफ(पीटीआय) आहे. मात्र यावेळेस पक्षाचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.

पाकिस्तानात ही निवडणूक ३३६ जागांसाठी होत आहे. तसेच विधानसभेच्या चार जागांसाठीही होत आहे. यासाठी एकूण ५,१२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात ४,०८७ पुरुष उमेदवार तर ३१२ महिलांचा समावेश आहे. तसेच २ ट्रान्सजेंडर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -