Friday, May 10, 2024
Homeविदेशरिअल माद्रिदचे मायदेशात जल्लोषात स्वागत

रिअल माद्रिदचे मायदेशात जल्लोषात स्वागत

तब्बल चार लाख स्पॅनिशियन चाहत्यांची उपस्थिती

माद्रिद (वृत्तसंस्था) : स्पॅनिशच्या रिअल माद्रिद फुटबॉल क्लबने आपले वर्चस्व अबाधित ठेवताना चॅम्पियन्स लीगमध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. माद्रिदने आपल्या करिअरमध्ये १४व्यांदा या लीगचा किताब पटकावला. माद्रिदने फायनलमध्ये इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूलचा पराभव केला. रिअल माद्रिदने १-० ने रोमहर्षक विजयाची नोंद केली. विनिसियसने (५९ वा मि.) या रंगतदार सामन्यात विजयी गोल केला. हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. दोन्ही तुल्यबळ संघांतील हा सामना अधिकच अटीतटीचा झाला. त्यामुळेच सामन्यात एकाच गोलची नोंद होऊ शकली.

दरम्यान, हा सामना हायस्कोअरिंगचा मानला जात होता. रिअल माद्रिदने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये इंग्लिश फुटबॉल क्लबला धूळ चारली आहे. युरोपातील सर्वात प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील चॅम्पियन रिअल माद्रिद क्लबचे सोमवारी मायदेशात आगमन झाले. त्यावेळी तब्बल चार लाख चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये किताबविजेत्या टीमचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. १४ वेळच्या चॅम्पियन रिअल माद्रिद टीमची ओपन टॉप बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. रिअल माद्रिद क्लबने पॅरिसच्या स्टेड दी फ्रान्स स्टेडियमवर फायनल मॅच जिंकली.

लिव्हरपूलचा पाच वर्षांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव झाला. आतापर्यंत दोन्ही वेळा माद्रिदविरुद्ध अपयशी ठरलेल्या इंग्लिश फुटबॉल क्लब लिव्हरपूलला पुन्हा एकदा सुमार खेळी चांगलीच महागात पडली. त्यामुळे टीमला पाच वर्षांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवाची धूळ चाखावी लागली. यादरम्यान दोन्ही वेळा लिव्हरपूलला स्पॅनिशच्या माद्रिद क्लबनेच पराभूत केले.

जुर्गेन क्लोपचा हा क्लब गेल्या आठवड्यातील सत्रात चारही ट्रॉफी आपल्या नावे करण्याच्या शर्यतीत होता. मात्र, क्लबच्या या आशेवर माद्रिदने पाणी फेरले. रिअल माद्रिद क्लबच्या रोमहर्षक विजयासाठी ५९ व्या मिनिटाला विनिसियस ज्युनियरने सर्वोत्तम गोल केला. त्यामुळे माद्रिदला आपला विजय निश्चित करता आला. स्टेड डि फ्रान्स स्टेडियमवरील या फायनलमधील हा एकमेव गोल ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -