Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमMumbai Accident : मुंबईतही १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बाईकने एका व्यक्तीला उडवलं!

Mumbai Accident : मुंबईतही १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बाईकने एका व्यक्तीला उडवलं!

अपघातात ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : पुण्यात १७ वर्षांच्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने अख्खा महाराष्ट्र तापला आहे. पालक मुलांचे करत असलेले अतिलाड या गोष्टीला कारणीभूत आहेत, असा आरोप यामुळे केला जात आहे. हे वातावरण तापलेलं असतानाच आता मुंबईतही अशाच प्रकारची घटना (Mumbai Accident) घडली आहे. मुंबईत एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बाईकने एका व्यक्तीला धडक दिली. या धडकेत तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलाने दुचाकीने एका ३२ वर्षीय तरुणाला उडवलं. दुचाकीच्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. काल सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इरफान नवाब अली शेख नावाचा व्यक्ती गंभीर झाला. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ भायखळा येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०४(२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -