Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीजेजे रुग्णालयात झाले मॉकड्रील, कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

जेजे रुग्णालयात झाले मॉकड्रील, कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

मुंबई: केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला नियंत्रित करण्यासाठी राज्यातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल (mockdrill) करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयातही (JJ Hospital) आज मॉकड्रिल झाले. यामध्ये औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, वैद्यकीय साधने, वैद्यकीय प्राणवायू, मनुष्यबळ आणि लसीकरणाची व्याप्ती याची माहिती घेण्यात आली.

दरम्यान देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. गेल्या २४ तासांत देशात कोरोना व्हायरसच्या ५ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार १९९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत एकूण १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या (Covid-19) आकड्यातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात सारख्या इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाची १ हजार ७९९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात ७८८ तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ७५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोनाला रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि लसीचा बूस्टर डोस घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या आढाव्यानुसार महानगरपालिकेची सर्व रुग्णालये कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मॉक ड्रिल म्हणजे नेमके काय?

1) मॉक ड्रिल ही आपत्तीच्या काळात नेमक्या कोणत्या पद्धतीने ती परिस्थीती हाताळायची याचे  संपूर्ण प्रात्यक्षिक आहे.
2) हे संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखण्यासाठी केले जाते.
3) हे केल्यामुळे विविध आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये समन्वय सुधारतो.
4) यामुळे एखाद्या आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज राहते आणि आपत्तीच्या परिस्थीतीत त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -