Tuesday, April 30, 2024
HomeदेशLok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात आला. भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार नॉर्थ ईस्टमध्ये दुपारी तीन वाजता संपला होता. दर देशाच्या इतर भागांमध्ये हा प्रचार संध्याकाळी सहा वाजता संपला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या नलबाडी येथे होते. आज त्यांची एक रॅली तेथे पार पडली. या रॅलीदरम्यान ते म्हणाले, ४ जूनला काय निकाल असेल हे स्पष्ट दिसत आहे. अशातच लोक म्हणत आहेत की चार जून, ४०० पार! पुन्हा एकदा मोदी सरकार.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सहारणपूर येथे रोड शो केला. येथे त्यांनी २५ मिनिटे १.५ किमी पदयात्रा केली. त्या या दरम्यान म्हणाल्या, मी प्रत्येक ठिकाणी हेच म्हणत आहे की ही निवडणूक जनतेची असणार आहे. लोकांच्या मुद्द्यांवर असली पाहिजे. इतर नेते इकडे तिकडे ध्यान भटकवण्याचे काम करत आहे.

लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकूण २१ ठिकाणच्या १०२ जागांवर मतदान होणार आहे. या दरम्यान अरूणाचलमधील दोन, आसामच्या पाच, बिहारच्या चार, छत्तीसगडच्या एक, मध्य प्रदेशमधील सहा, महाराष्ट्रातील पाच, मणिपूरचे दोन, मेघालयमधील दोन, मिझोरमच्या एक, नागालँडमधील एक, राजस्थानातील १२, सिक्कीमधील एक, तामिळनाडूच्या ३९, त्रिपुरामधील एक, यूपीमधील आठ, उत्तराखंडच्या पाच, पश्चिम बंगालच्या तीन, अंदमान आणि निकोबारमधील एक, जम्मू-काश्मीरमधील एक, लक्षद्वीपमधील एक आणि पाँडिचेरीच्या एका जागेवर मतदान होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -