Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वInvestment Option For Women : 'हे' आहेत महिलांसाठी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, कधीही...

Investment Option For Women : ‘हे’ आहेत महिलांसाठी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय, कधीही पैशांची उणीव भासणार नाही

जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : सध्याच्या काळात महिलांनी गुंतवणूक करणे अत्यंत म्हत्त्वाचे आहे. मग ती २० वर्षांची असो, नोकरदार असो, गृहिणी किंवा अविवाहित असो. सर्वांच्या जीवनात गुंतवणूक हा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. महिलांनी आर्थिक दृष्टीने सजग असणे फार गरजेचे आहे. भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पैसे जवळ असणे गरजेचे आहे.

आजच्या जगात महिला या कॉर्पोरेट, क्रीडा, करमणूक अशा विविध क्षेत्रांतील अडथळे दूर करताना दिसतात. तथापि एक महत्त्वाचा पैलू मागे पडतो तो म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. याच पार्श्वभूमीवर महिला कोणकोणत्या योजनांत गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करू शकतात, ते जाणून घ्या.

  • महिला पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये (पीपीएफ) खाते खोलून त्यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेत एकूण १५ वर्षांच्या मुदतीवर गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. सध्या सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर ७.१ टक्के व्याज देत आहे.
  • नॅशनल पेन्शन स्कीमध्येही महिला पैशांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत पैसे गुंतवल्यास महिलांचे भविष्य एका प्रकारे सुरक्षित होते. आयुष्याच्या उत्तरार्धात महिलांना आर्थिक अडचणी येणार नाहीत. ही योजना पेन्शन फंड रेग्यूलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) या संस्थेकडून चालवली जाते.
  • म्यूच्यूअल फंड हादेखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. भविष्यकालीन आर्थिक गरजा लक्षात घेऊन महिला म्यूच्यूअल फंडमधील इक्विटी, डेब्ट किंवा हायब्रिड फंडमध्ये गुंतवू शकतात.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून महिलांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे जीवन विमा चालू करण्यात आलेले आहेत. भविष्यात स्वत:ला तसेच कुटुंबीयांना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी महिला स्वत:चा एक जीवन विमा काढू शकता.
  • तसेच वेगवेगळ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीच्या योजनेतही महिला पैसे गुंतवू शकतात. एफडीच्या मदतीनेही महिलांना गुंतवलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -