Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीVarsha Gaikwad : काँग्रेसमध्ये फूट? वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेस नेते...

Varsha Gaikwad : काँग्रेसमध्ये फूट? वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेस नेते एकत्र

वर्षा गायकवाड उद्या अर्ज दाखल करण्यापूर्वी भरली विरोधी बैठक

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा उत्तर-मध्य मुंबईच्या जागेवरुन मविआकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत फूट पडली आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी आपली नाराजी स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडली. त्यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेसचे काही नेते एकत्र आले आहेत. वर्षा गायकवाड उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्याआधीच आज काँग्रेस नेत्यांनी गायकवाड यांच्या उमेदवारी विरोधात बैठक भरवली आहे.

वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकही उमेदवार अल्पसंख्याक समाजातून उभा न केल्याचा निषेध केला. नसीम खान यांची नाराजी ताजी असतानाच आज मुंबई काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात एकवटले आहेत. नसीम खान यांच्यासह भाई जगताप, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारी एकत्र आले आहेत. वर्षा गायकवाड मतदारसंघात बाहेरच्या उमेदवार असल्याचा आरोप होत आहे.

नसीम खान यांनी काँग्रेसवर केले आरोप

दुसरीकडे, नसीम खान यांनी राजीनामा देताना “दोन महिन्यांपूर्वी मला पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे मुंबईतील अल्पसंख्याक समाजात उत्साह संचारला होता. तथापि, पक्षाने या जागेवरून वेगळे नाव जाहीर केले आहे, ज्यामुळे अल्पसंख्याक समाजात अशांतता निर्माण झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती.

“मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये पक्षाच्या आदेशांचे पालन करत आहे. मी प्रामाणिकपणे आदेश पूर्ण केले. पण एकाही अल्पसंख्याक सदस्याला उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न अल्पसंख्याक समाजाने विचारला तर मी आता अवाक् होईन. त्यामुळे मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -