Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाKL Rahul: सोशल मीडियावरील ट्रोल्समुळे त्रस्त होता टीम इंडियाचा संकटमोचक

KL Rahul: सोशल मीडियावरील ट्रोल्समुळे त्रस्त होता टीम इंडियाचा संकटमोचक

मुंबई: दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये सलग दुसरी सेंच्युरी ठोकणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने(KL Rahul) सोशल मीडियावरील ट्रोलपासून बचावाच्या आपल्या पद्धतीबाबत खुलेपणाने सांगितले. त्याने यावर जोर दिला की कोणत्याही इतर खेळाडूंप्रमाणेच त्याच्यावरही निगेटिव्ह कमेंट्सचा परिणाम होतो.

राहुलने सांगितले की या वर्षाच्या सुरूवातीला दुखापतीमुळे त्याला त्याच्या बुद्धीवर काम करण्यास वेळ मिळाला आणि त्याला हे समजले की आपल्या बॅटला बोलू देणे हेच सोशल मीडियावरील नकारात्मकता दूर करण्याची पद्धत आहे.

वर्षाच्या सुरूवातीला झाला होता बाहेर

सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक ठोकल्यानंतर केएल राहुलने याचा खुलासा केला. केएल राहुल या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान बाहेर झाला होता. त्यानंतर केएल राहुलने आता कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे आणि येताच शानदार शतकही झळकावले.

केएल राहुल आयपीएलदरम्यानही दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो अनेक महिने क्रिकेट खेळू शकला नव्हता. याच कारणामुळए तो विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भागही नव्हता. दरम्यान त्याने आशिया कपद्वारे पुनरागमन केले आणि कमालीची फलंदाजी केली.

आशिया चषकातून शानदार पुनरागमन

केएल राहुलने आशिया चषकात अनेक शानदार खेळी केल्या. त्यानंतर त्याने विश्वचषकात केवळ पाचव्या स्थानावरील भूमिकाच चोख निभावली नाही तर विकेटकीपिंगनेही कमाल केली. केएल राहुल डीआरएस घेण्याबाबत कर्णधाराला अतिशय योग्य सल्ला देत होता.

सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारताने पहिल्या डावात केएल राहुलच्या शानदार शतकाच्या जोरावर एकूण २४५ धावा केल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद २५६ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गर नेहमीप्रमाणे क्रीझवर टिकून आहे आणि १४० धावांवर नाबाद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -