Tuesday, April 30, 2024
Homeमहत्वाची बातमीIran-Israel War :अर्ध्या रात्री इराणचा इराकवर ड्रोन हल्ला, मिडल ईस्टमध्ये युद्ध

Iran-Israel War :अर्ध्या रात्री इराणचा इराकवर ड्रोन हल्ला, मिडल ईस्टमध्ये युद्ध

नवी दिल्ली: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढते तणाव त्याच दिशेला गेले आहेत ज्याची भीती होती. इराणने इस्त्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इस्त्रायलच्या सैन्याने म्हटले की इराणने आपल्या क्षेत्रातून इस्त्रायलवर ड्रोन हल्ला केला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे सैन्य हायअलर्टवर आहे आणि सातत्याने निगराणी करत आहे.

इस्त्रायलचे एअरफोर्स फायटर जेट आणि इस्त्रायलचे नौदलाच्या जहाजांसोबत आयडीएफने एरियल डिफेन्सलाही हायअलर्टवर ठेवले आहे. इस्त्रायलचे हवाई आणि नौदलाचे सैन्यही निगराणीखाली आहे. यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीवच्या किरयामध्ये वॉर कॅबिनेटची बैठक बोलावली आहे.

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन नॅशनल सिक्युरिटी टीमसोबत व्हाईट हाऊसमध्ये मीटिंग करत आहे. दुसरीकडे, इराणकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर इराणचे नेते खामेनेई यांच्या अधिकृत X हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात खेमेनईने म्हटले की दृष्ट सरकारला दंड दिला गेला पाहिजे.

इराणने २००हून अधिक ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून इस्त्रायलवर हल्ला केला आहे. दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटीश एअरफोर्सने ड्रोन आणि मिसाईल्सला हवेत मारण्यास इस्त्रायलची मदत केली. इस्त्रायलच्या दक्षिण भागात एका मिलिट्री बेसवर साधारण नुकसान झाले.

हल्ला पाहता मिडल ईस्टमधील अनेक देशांनी आपापले एअरस्पेस बंद केले आहेत. इस्त्रायलचे पश्चिम सहयोगी आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंतोनियो गतारेसने इराणी हल्ल्याची निंदा केली आहे. इस्त्रायलच्या मागणीवर रविवारी संध्याकाळी ४ वाजता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की ते इस्त्रायलची मदत करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -