Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाशिवम दुबेच्या रूपात भारताला मिळाला हार्दिक पांड्याचा पर्याय?

शिवम दुबेच्या रूपात भारताला मिळाला हार्दिक पांड्याचा पर्याय?

मुंबई: शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार फिनिशिंग खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला होता. दुबेने ४० बॉलमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा केल्या. याआधी त्याने बॉलिंग करताना एक विकेट मिळवली होती. तसेच त्याने २ ओव्हर गोलंदाजी करत केवळ ९ धावा दिल्या होत्या. त्याच्या या ऑलराऊंडर कामगिरीनंतर भारतीय संघात तो हार्दिक पांड्याला पर्याय असू शकेल का या चर्चांना उधाण आले आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅच राहणाऱ्या शिवम दुबेने अशा वेळेस चांगली कामगिरी केली जेव्हा हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा मु्ख्य ऑलराऊंडर आणि पहिली पसंती आहे. २०२३ वनडे विश्वचषकात तो दुखापतग्रस्त झाला होता. मात्र अद्याप तो संघात परतलेला नाही.

शिवम दुबे हार्दिक पांड्याला पर्याय?

हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त आहे. यामुळे वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून शिवम दुबेला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत संधी मिळाली आहे. शिवम दुबेने पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली. जर शिवम दुबेने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली तर तो हार्दिक पांड्याला पर्याय ठरू शकतो.

असे राहिलेय करिअर

शिवम दुबे भारतासाठी व्हाईट बॉल क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत १ वनडे आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत. एकमेव वनडेत शिवमने फलंदाजी करताना ९ धावा केल्यात . याशिवाय त्याने टी-२०मध्ये १२ डावांत बॅटिंग करताना ३५.३३च्या सरासरीने आणि १३९.४७च्या स्ट्राईक रेटने २१२ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २ अर्धशतके ठोकली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -