Friday, May 10, 2024
Homeक्रीडाIND vs NZ: टीम इंडियाविरुद्ध काय असणार न्यूझीलंडची रणनीती? लॉकी फर्ग्युसनने दिले...

IND vs NZ: टीम इंडियाविरुद्ध काय असणार न्यूझीलंडची रणनीती? लॉकी फर्ग्युसनने दिले संकेत

मुंबई: विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) सेमीफायनल सामन्याच्या आधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने भारताविरुद्ध आपल्या संघाच्या तयारीबाबत विस्ताराने चर्चा केली. एका पत्रकार परिषदेत त्याने सांगितले की न्यूझीलंडसा या मोठ्या सामन्यात कसे स्थिर राहायचे यावर कौशल्यावर कायम राहणार आहे. तसेच गोलंदाजांचा असाही प्रयत्न असेल की या सामन्यात भारतीय संघाला मोठे ओव्हर दिले जाऊ नयेत. म्हणजेच कोणत्याही ओव्हरमध्ये भारतीय फलंदाजांना जास्त धावा करू न देणे.

लॉकी फर्ग्युसन म्हणाला, आम्ही आमच्या प्रक्रियेवर कायम राहतो. हे ऐकायला नेहमीचे रटाळ वाटत असेल मात्र यामुळे आमचे संतुलन कायम राहते. आम्ही आमचे पाय जमिनीवर ठेवतो. मला वाटते की ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.

पिचवर कितपत चांगला स्कोर होईल?

फर्ग्युसन म्हणाला, वनडे सामन्यांत खासकरून भारताविरुद्ध खूप चढाव-उतार येत असतात. या गेममध्येही वेगळे काही होणार नाही. आम्ही जितके शक्य असेल तितके स्वत:ला मजबूत राखण्याचा प्रयत्न करू. आम्ही विकेटसोबत ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करू. या पिचवर कितपत स्कोर चांगला बनवता येईल याचा विचार करावा लागेल. त्यानंतर त्या स्कोरचा बचाव करण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करावे लागतील. जर आम्ही पहिल्यांदा फलंदाजी केली तर आम्ही स्कोर बोर्डवर जास्तीत जास्त धावा दाखवण्याचा प्रयत्न करू.

वानखेडे सर्वाधिक धावांचे मैदान

अनेक भारतीय मैदाने ही सर्वाधिक धावांची आहेत. आम्ही हे समजण्याचा प्रयत्न करू की पिच कशी असेल आणि यावर डिफेंड तसेच चेस करण्यासाठी किती स्कोर करणे गरजेचे आहे. आम्हाला मोठे ओव्हर्स देण्यापासून रोखावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -