Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीIsrael Hamas War: गाझावर हमासने नियंत्रण गमावले, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

Israel Hamas War: गाझावर हमासने नियंत्रण गमावले, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

तेल अवीव: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. यातच इस्त्रायलच्या संरक्षमंत्र्यांनी सोमवारी दावा केला की हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे. हा दावा पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांकडून इस्त्रायलवर अचानक केलेल्या हल्लानंतर आणि ५००हून अधिक रॉकेट डागल्यानंतर एक महिन्यानंतर समोर आले आहे. ७ ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत जोरदार बॉम्बहल्ला केला.

समोर आलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या सीमेवर घुसखोरी करत सगळ्यात भयानक युद्धाला सुरूवात केली. यात तब्बल १२०० लोक मारले गेले. यात मोठ्या प्रमाणातन नागरिक होते. तर तब्बल २४० लोकांना बंदी बनवण्यात आले.

हमासचे शासन असलेल्या गाझा पट्टीत आरोग्य मंत्री यूसुफ अबू रिश म्हणाले, उर्जेच्या कमतरतेमुळे क्षेत्राच्या उत्तरेतील सर्व हॉस्पिटल्स ठप्प झाले आहेत. अबू रिश म्हणाले गाझाच्या सगळ्यात मोठ्या अल शिफा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ७ मुलांचा जन्मानच्या आधी आणि २७ रुग्णांचा मृत्यू झाला.

गाझाला पूर्णपणे इस्त्रायलने घेराव घातला आहे. भोजन, इंधन तसेच इतर आवश्यक वस्तूंची कमतरता आहे. पॅलेस्टाईन पंतप्रधान मोहम्मद शतयेहने सोमवारी युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्रात गाझामध्ये पॅराशूट मदतीचे आवाहन केले. तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी अमेरिकन मीडियाला सांगितले की गाझामध्ये हमासकडून बंदी बनवण्यात आलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी एक करार केला जाऊ शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -