Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीLiquor: या राज्य सरकारने १७ दिवसांत विकली गेली तब्बल ३ कोटी दारूच्या...

Liquor: या राज्य सरकारने १७ दिवसांत विकली गेली तब्बल ३ कोटी दारूच्या बाटल्या, जाणून घ्या किती झाली कमाई

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये(delhi) दिवाळीच्या सणादरम्यान शुक्रवारते रविवारपर्यंत लोकांनी तब्बल १२१ कोटी रूपयांची ६४ लाख दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. अधिकृत आकडेवारीनुसार दिवाळीच्या एक आठवड्याआधी एक कोटीपेक्षा अधिक दारूच्या बाटल्यांच्या विक्रीतून सरकारला २३४.१५ कोटी रूपयांची कमाई झाली. तर गेल्या १७ दिवसांत एकूण ५२५ कोटी रूपयांहून अधिकची कमाई झाली.

दिल्लीच्या अबकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत होळी आणि दिवाळीसारख्या सणांदरम्यान दारूची विक्री वाढते. दारू ही केवळ व्यक्तिगत पिण्यासाठीच घेतली जात नाही तर गिफ्ट म्हणून देण्यासाठीही खरेदी केली जाते.

३ दिवसांत तब्बल ६४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री

अधिकृत आकडेवारीनुसार दिवाळीच्या आधी १७ दिवसांत एकूण विक्रीम तीन कोटींपेंक्षा अधिक होती. यात दिल्ली सरकारला ५२५.८४ कोटी रूपये मिळाले. दिवाळीच्या आधी दारूच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आणि गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी दुकांनातील अनुक्रमे १७.३३ लाख, १८.८९ लाख आणि २७.८९ लाख बाटल्यांची विक्री झाली. दिवाळीला दारुची दुकाने बंद होती.

२०२२च्या तुलनेत दारूची विक्री वाढली

आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांत ६४ लाखाहून अधिक बाटल्यांच्या विक्रीतून दिल्ली सरकारला एकूण १२०.९२ कोटी रूपयांची कमाई झाली. गेल्या वर्षी दिवाळीच्या तीन दिवस आधी हा आकडा अनुक्रमे १३.४६ लाख, १५ लाख आणि १९.३९ लाख इतका होता. २०२२मध्ये दिवाळीच्या आधी १७ दिवसांत दिल्लीत २.११ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीी ही संख्या ४२ टक्क्यांनी वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -