Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIND vs IRE : ही मोठी डोकेदुखी आहे, विजयानंतरही असं का म्हणाला...

IND vs IRE : ही मोठी डोकेदुखी आहे, विजयानंतरही असं का म्हणाला बुमराह

डबलिन: आयर्लंड (ireland) आणि भारत (india) यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने (team india) अतिशय सहजपणे ३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये आधी फलंदाजांनी तर नंतर गोलंदाजांनी कमाल केली.

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या. यानंतर आयर्लंडच्या डावाला १५२ धावांवर रोखले. यासोबतच टीम इंडियाने या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही मोठे विधान केले आहे.

ही सगळ्यात मोठी डोकेदुखी

आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्याच्यासाठी कोणती गोष्ट सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे याचा खुलासा केला. त्याने सांगितले सगळ्यात कठीण आहे अंतिम ११ची निवड करणे.

विजयानंतर बुमराह म्हणाला, मला चांगले वाटत आहे. हे खूपच शानदार आहे. मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे अंतिम ११ची निवड करणे. सगळेच उत्सुक आहेत. सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड आङे. आम्हाला सगळ्यांनाच भारतासाठी खेळायचे आहे. अखेर सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने काम करावे लागेल. जर तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून खेळता तर तुम्ही दबावात आहात. तुम्हाला त्या अपेक्षा एका बाजूला ठेवाव्या लागतील. जर तुम्ही इतक्या अपेक्षांसोबत खेळत आहात तर तुम्ही १०० टक्के स्वत:ला न्याय देऊ शकत नाही.

दुसऱ्या टी-२०मध्ये बुमराहची जादू

पहिल्या सामन्यात दोन विकेट घेत बुमराहने शानदार कमबॅक केले. दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याचा जलवा पाहायला मिळाला. बुमराहने चार ओव्हरमध्ये १५ धावा देत २ विकेट मिळवल्या. बुमराह सध्या फॉर्ममध्ये दिसत आहे. तो आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये भारताचा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -