Sunday, May 19, 2024
HomeदेशChandrayaan-3: 'चांद्रयान ३' कडून मिळाली आहे ही खुशखबर

Chandrayaan-3: ‘चांद्रयान ३’ कडून मिळाली आहे ही खुशखबर

नवी दिल्ली: भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम (chandrayaan 3 mission) चंद्राच्या दिशेने पुढेपुढे सरकत आहे. त्यातच आता चांद्रयान ३ कडून आणखी एक खुशखबर मिळाली आहे. १७ ऑगस्ट २०२३ला जे प्रोपल्शन मॉड्यूल(propulsion module) विक्रम लँडरपासून वेगळे झाले होते. त्याचे जीवन ३ ते ६ महिने सांगितले जात होते. मात्र हे मॉड्यूल आता अनेक वर्षे काम करत राहणार आहे. इस्रोने असा दावा केला आहे.

इस्रोची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होण्यास काही तास शिल्लक आहेत. तीन दिवसांत विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. मात्र हे लँडर तीन दिवस आधीच प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले होते. १७ ऑगस्टला चांद्रयान ३चे दोन भाग झाले होते.

प्रोपल्शन मॉड्यूलला सोडून विक्रम लँडर पुढच्या रस्त्यावर निघाला होता. इस्रोचे माजी वैज्ञानिक विनोद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की जेव्हा चांद्रयान ३ लाँच झाले होते तेव्हा प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये १६९६.४ किग्रॅ इंधन होते. यानंतर प्रोपल्शन मॉड्यूलच्या मदतीने पृथ्वीच्या चारही बाजूंनी पाच वेळा कक्षा बदलली. हे इंजिन सहा वेळा सुरू करण्यात आले होते.

यानंतर चांद्रयान ३ चंद्राच्या हायवेवर आले. त्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सहा वेळा प्रोपल्शन मॉड्यूलचे इंजिन सुरू करण्यात आले. एकूण मिळून १५४६ किग्रॅ संपले. म्हणजेच आता यामध्ये १५० किग्रॅ इंधन बाकी आहे. म्हणजेच हे प्रोपल्शन मॉड्यूल ३ ते ६ महिने नव्हे तर अनेक वर्षांपर्यंत काम करू शकते.

याला इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले की आमच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक आहे. जर सगळं काही सुरळीत झालं आणि जास्त त्रास झाला नाही तर प्रोपल्शन मॉड्यूल अनेक वर्षांपर्यंत काम करू शकते. हे सर्न चंद्राच्या चारही बाजूंच्या कक्षेच्या करेक्शनवर अवलंबून आहे.

२३ ऑगस्टला लँडिंग

येत्या २३ ऑगस्टला चांद्रयान ३ चे लँडिंग होणार आहे. याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही २३ ऑगस्ट २०२३ला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून पाहू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -