Monday, May 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजउपमुख्यमंत्री पवारांच्या प्रश्नावर चिडले मुख्यमंत्री, फडणवीसांनी घेतली धाव

उपमुख्यमंत्री पवारांच्या प्रश्नावर चिडले मुख्यमंत्री, फडणवीसांनी घेतली धाव

मुंबई: काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील रुग्णालयात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिखट सवाल केला. मात्र एकनाथ शिंदेंनीही पवार यांनाच त्यांच्याच भाषेत याचे उत्तर दिले. दरम्यान, वादाची ठिणगी पडेल असे दिसताच वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला.

शुक्रवारी झालेल्या मंत्र्यांच्या खासगी बैठकीदरम्यान हे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील सध्याचे प्रश्न, तसेच नियोजन, त्यावरील उपाययोजना याबाबत मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणाचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

यावेळेस तुमच्या ठाण्यात इतके मृत्यू कसे झाले? घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे. असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. अजित पवारांच्या या प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडले आणि त्यांनी त्याच अंदाजात पवार यांना उत्तर दिले. दरम्यान, त्यांच्या या बोलण्याचे रूपांतर वादात होऊ नये म्हणून वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण तिथेच थांबवले.

जेव्हा अजित पवार यांनी कळवा रुग्णालय मृत्यूप्रकरणी सवाल उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्ण गंभीर स्थितीत होते. किती रुग्ण शेवटच्या घटकेला रुग्णालयात आणले गेले? तसेच रुग्णालयावर असलेला तणाव याची सर्व माहिती त्यांनी अजित पवार यांना दिली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, त्यांना समजले की हा विषय अधिक वाढू नये म्हणून त्यांनी लगेचच दुसरा विषय काढत या मुद्द्यावरून साऱ्यांचे लक्ष हटवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -