Thursday, May 23, 2024
Homeताज्या घडामोडीमाथेरान रेल्वेच्या शटल सेवेच्या फेऱ्यांत वाढ

माथेरान रेल्वेच्या शटल सेवेच्या फेऱ्यांत वाढ

मुकुंद रांजाणे

माथेरान : सुट्ट्यांच्या हंगामात माथेरानमधून दस्तुरी मोटार पार्किंगपर्यंत जाण्यासाठी माथेरान स्टेशनपासून जवळपास तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने अनेकदा रेल्वेच्या शटल सेवेचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना गर्दीच्या वेळी तिकीट उपलब्ध होत नाहीत. या कामी नुकतीच रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी माथेरान स्टेशनला धावती भेट दिली होती. त्यावेळेस नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी अन्य ग्रामस्थांसह या मार्गावर शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करावी, अशी माथेरानकरांच्या वतीने विनंती केली होती.

त्या विनंतीस अधीन राहून शलभ गोयल यांनी दि. ८ नोव्हेंबरपासून या फेऱ्यांत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे येथील रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दस्तुरी नाक्याजवळ असलेल्या अमन लॉज रेल्वेस्टेशनपासून माथेरान स्टेशनपर्यंत येण्यासाठी शटल सेवा हाच एकमेव स्वस्त आणि सुरक्षित उत्तम पर्याय आहे. येणाऱ्या पर्यटकांना अन्य वाहतुकीचा अवाजवी खर्च न परवडणारा असल्याने बहुतांश पर्यटक याच शटल सेवेचा आधार घेतात.

मागील काळात या मार्गावर शटलच्या आठ फेऱ्या उपलब्ध होत्या, तर शनिवार आणि रविवारच्या दिवशी अन्य दोन फेऱ्या रेल्वेच्या माध्यमातून व्हायच्या; परंतु सोमवार दि. ८ नोव्हेंबरपासून सोमवार ते रविवार या सर्व दिवशी अप-डाऊन अशा दहा फेऱ्या करण्यात आल्या आहेत.

माथेरान – अमन लॉज शटल सेवेच्या दोन फेऱ्या वाढवल्या बद्दल रेल्वे अधिकारी शिवाजी मानसपुरे आणि स्टेशन मास्टर जी. एस. मीना तसेच संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा यांनी आभार मानले.

शटल सेवेचे वेळापत्रक

माथेरान ते अमन लॉज रेल्वे स्टेशन

सकाळी : ०८.१५, ०९.३०, १०.२०, ११. २५
दुपारी : १२.२०, १३.२५, १४.४०, १५.३०
संध्याकाळी : १६. २०, १७.१०

अमन लॉज ते माथेरान स्टेशन

सकाळी : ०८.४०, ०९.५५, १०.४५ , ११.५५
दुपारी : १२.४५, १४.००, १५.०५, १५.५५,
संध्याकाळी : १६.४५, १७.३५

तिकीटदर

प्रथम श्रेणी तिकीट

प्रति प्रौढ : ३०५ रुपये
लहान मुले : १८० रुपये

द्वितीय श्रेणी

प्रति प्रौढास : ४५ रुपये
लहान मुले : ३० रुपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -