Sunday, June 16, 2024
Homeक्राईमPune Car aacident : अख्खं अग्रवाल कुटुंब क्रिमीनल! माझ्यावर गोळी झाडण्याचाही केला...

Pune Car aacident : अख्खं अग्रवाल कुटुंब क्रिमीनल! माझ्यावर गोळी झाडण्याचाही केला होता प्रयत्न

शिवसेना नेते अजय भोसले यांनी उघड केली धक्कादायक माहिती

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात (Kalyani Nagar Accident) रविवारी १९ मे रोजी पहाटे एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) हा १७ वर्षांचा असून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. विशाल यांचे सरकारी यंत्रणेशी व अंडरवर्ल्डशी लागेबांधे आहेत, त्यामुळे मुलावर कठोर कारवाई झाली नाही आणि घटनेनंतर पाच तासांतच त्याला जामीन देण्यात आला, असा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale) यांनी गंभीर आरोप करत ‘अख्खं अग्रवाल कुटुंबच गुन्हेगारी प्रवृत्तीचं आहे, पैशांनी काहीही विकत घेता येऊ शकतं, असं त्यांना वाटतं’, असं म्हटलं आहे.

अल्पवयीन आरोपी विशालचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendrakumar Agrawal) यांचेही अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. यावर अजय भोसले यांनी भाष्य केलं आहे.

अजय भोसले म्हणाले, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते. या सगळ्याचे पुरावे असूनही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अद्याप अटक होऊ शकलेली नाही. त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात. संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल आहे. कुटुंबातील सर्व लोकांवर दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. आतादेखील अपघात प्रकरणानंतर आपण पैशांच्या जोरावर आपण सगळं काही विकत घेऊ, असं त्यांना वाटतं. ती मोठी लोकं आहेत, त्यांना कायदा-सुव्यवस्थेची भीती नाही, असे अजय भोसले यांनी सांगितले.

अजय भोसलेंवर झाला होता गोळीबार

यावेळेस अजय भोसले यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराविषयीही सांगितले. ते म्हणाले, मी २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीच्या निवडणुकीला उभा होतो. त्यावेळी माझे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे बंधू राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते. तेव्हा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि राम अग्रवाल यांच्यात १२०० कोटींच्या संपत्तीवरुन वाद सुरु होता. तेव्हा मला धमकीसाठी सतत छोटा राजनचे फोन यायचे. राम अग्रवाल हे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देत नव्हते. यामध्ये मी राम अग्रवाल यांना पाठिंबा देतो, असे सुरेंद्रकुमारने छोटा राजनला सांगितले. ते मला मारण्याची सुपारी देण्यासाठी बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते.

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अजूनही अटक झाली नाही

माझा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असताना पुण्यातील जर्मन बेकरीजवळ छोटा राजनच्या शुटर्सनी माझ्यावर पहिला राऊंड फायर केला. मात्र, त्यांचा नेम चुकला. त्यानंतर आम्ही दोन किलोमीटरपर्यंत गुंडांचा पाठलाग केला. त्यावेळी त्या गुंडांनी दुसरी गोळी झाडली, ती गाडीच्या काचेला लागून माझ्या मित्राच्या छातीत शिरली. आम्ही त्याला घेऊन रुग्णालयात गेलो. एक वर्षांनी आरोपी पकडले गेले तेव्हा त्यांनी कबुली दिली की, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती. हे काम आम्हाला सोपवण्यात आले. छोटा राजनला अटक करुन भारतात आणल्यानंतर त्याच्याविरुद्धच्या सगळ्या केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. तेव्हा माझ्यावरील गोळीबारप्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली पाहिजे होती. मात्र, अजूनही त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देऊन हे प्रकरण रफादफा करायचे आहे, असे अजय भोसले यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -