Sunday, June 16, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : नेहमी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणार्‍या सुप्रियाताई पुणे प्रकरणावर गप्प...

Nitesh Rane : नेहमी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणार्‍या सुप्रियाताई पुणे प्रकरणावर गप्प का?

पुणे अपघातातल्या अग्रवालांशी पवार कुटुंबियांचे संबंध आहेत का?

भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांचा रोखठोक सवाल

४ जूननंतर राजकीय जाणकारांचे सगळे कार्यक्रम बंद होतील; नितेश राणे यांचं वक्तव्य

मुंबई : पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Car Accident) राज्यभरात वातावरण प्रचंड तापले आहे. अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणारे पब्स, पालकांकडून होणारे अतिलाड असे बरेच मुद्दे यानिमित्ताने चर्चेत आले आहेत. या प्रकरणी वेदांतचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर वेदांतलाही १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. राज्यभर हे प्रकरण पेटले असतानाच पुण्यात प्राबल्य असणार्‍या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar group) मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आवाज उठवला आहे. ‘नेहमी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणार्‍या सुप्रियाताई पुणे प्रकरणावर गप्प का?’ असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, नेहमी बोलणार्‍या सुप्रियाताई सुळे यावेळी गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून याबाबत कोणतीच प्रतिक्रिया का आलेली नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणार्‍या सुप्रियाताई या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि पवार कुटुंबियांचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण अग्रवाल साहेबांचे वकील हे पवारसाहेबांचे निकटवर्तीय आहेत, असं आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल पुणे कमिशनरच्या ऑफीसमध्ये बसून स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यानुसार त्या मुलावर लगेच कारवाईही करण्यात आली. पण या सगळ्याबाबत सुप्रियाताईंनीही प्रतिक्रिया द्यावी, म्हणजे अनेक रहस्यं बाहेर येतील, असं नितेश राणे म्हणाले.

मतदानात दिरंगाई केली असे उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, जेव्हा निवडणूक तुमच्या दिशेने जात नाही आहे. ४ जूनला एनडीएचाच विजय होणार हे आता पक्कं झालं आहे. त्यामुळे शेंबड्या मुलासारखं तुम्ही नाक रगडत आहात. निवडणूक लढवण्याची तुमच्यात क्षमता नाही, लायकी नाही. उगाच मोठमोठी भाषणं करायची, पण देशाची जनता आदरणीय मोदींसाहेबांबरोबरच आहे, हे कळून चुकल्यामुळे आता नाक रगडण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. त्यातून मतदान केंद्रांबाबत ते तक्रारी करत आहेत. त्यामुळे तुमचा पराभव होणार आहे, हे खुल्या मनाने स्विकारा आणि हा रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रातील बोगस मतदारांकडे लक्ष द्यावं

मतदान कमी व्हावं म्हणून निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, निवडणूक आयोग ही संस्था वर्षानुवर्षे आपल्या भारतात लोकशाही टिकवण्याचं काम करत आहे. महाविकास आघाडीचे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत. स्वतःला मतदान मिळत नाही, पराभव पक्का आहे त्यामुळे कोणाला तरी बळीचा बकरा बनवावा यासाठी ते निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रामध्ये किती बोगस मतदार आहेत, याकडे थोडं लक्ष द्यावं. कारण मोठ्या प्रमाणात रोहिंगे आणि बांगलादेशी मतदान करत असतील तर ते आपल्या देशासाठी घातक आहे, असं नितेश राणे म्हणाले.

४ जूननंतर सगळे कार्यक्रम बंद होतील

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय जाणकारांची अनेक मतं येत आहेत. त्यात काहींनी भाजपा ३०० पार जाईल तर काहींनी २५० च्या वर जाणार नाही, अशी मतं व्यक्त केली आहेत. यावर प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, अशा प्रकारची मतं २०१९ ला देखील आली होती आणि २०१४ ला देखील आली होती आणि निकालानंतर सर्वांच्या तोंडाला कुलूप लागलं. देशाची जनता मोदीजींबरोबर आहे, हे आता मतपेटीमध्ये लॉक झालं आहे. फक्त निकाल येऊ दे म्हणजे ४ जूननंतर सगळे कार्यक्रम बंद होतील, असं नितेश राणे म्हणाले.

उबाठासारखी पाडापाडी भाजपामध्ये होत नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पाडण्यासाठी भाजपाच्याच एका बड्या नेत्याने विनायक राऊतांना ५० कोटी दिले आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. यावर नितेश राणे म्हणाले, असं असेल तर त्यांनी त्या नेत्याचं नाव जाहीर करावं. जर तुम्हाला ५० कोटी हा आकडाही माहित असेल तर नावही जाहीर करा म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल. उबाठामध्ये जशी पाडापाडी होते तशी भाजपामध्ये होत नाही. उबाठाच्या लोकांना पाडण्यासाठी उबाठाच्याच लोकांनी कसे आणि किती पैसे दिले आहेत, याची यादी मग आम्हालाही जाहीर करावी लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -