Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीAmruta Fadnavis : शेम ऑन ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड!

Amruta Fadnavis : शेम ऑन ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड!

पुणे अपघातप्रकरणी अमृता फडणवीसांनी व्यक्त केला तीव्र संताप

मुंबई : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) हा १७ वर्षांचा असून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्यामुळेच त्याच्यावर ठोस कारवाई अद्यापही करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कारवाईची माहिती दिली. या कारवाईदरम्यान, ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने (Juvenile Justice Board) अनपेक्षित भूमिका घेतल्याचे समजले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आरोपीचे वय १७ वर्षे व ८ महिने असल्यामुळे निर्भयाकांडानंतर कायद्यात झालेल्या अमेंडमेंटनुसार आरोपीला प्रौढ समजून खटला चालवण्यास परवानगी द्यावी, अशा प्रकारे पुणे पोलिसांनी ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डकडे अॅप्लिकेशन केलं होतं. दुर्दैवाने ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डने हे अॅप्लिकेशन केवळ सीन आणि फाईल्ड केल्याने पोलिसांसाठीही हा धक्का ठरला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर पुणे पोलिसांनी वरच्या कोर्टात केलेल्या अर्जानंतर ज्युएनाईल जस्टिस्ट बोर्डला ऑर्डर रिन्यू करण्यास सांगितले आहे.

या संपूर्ण प्रकारावर अमृता फडणवीस यांनी परखड मत मांडलं आहे. दोन निष्पाप जीवांचा यात बळी गेल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठीण कारवाईची मागणी केली आहे. एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, ‘पुण्यातील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. पण यातील प्रमुख आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. बाल न्याय मंडळानं त्याला दिलेला जामीन हा लाजीरवाणा निकाल आहे’, असं त्या म्हणाल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -