Friday, April 26, 2024
Homeक्रीडाअजिंक्य, इशांत, जडेजा दुखापतग्रस्त कसे?

अजिंक्य, इशांत, जडेजा दुखापतग्रस्त कसे?

मुंबई : कसोटीसाठी पहिल्या कसोटीतील कर्णधार अजिंक्य रहाणेसह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला वगळण्यात आले. या त्रिकुटाच्या जागी नियोजित कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू जयंत यादव आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली.

अजिंक्य, इशांत, जडेजाला वगळण्यामागे दुखापतींचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, एकाच वेळी तीन क्रिकेटपटू इंज्युअर्ड दाखवल्याने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन टीकेचे लक्ष्य बनले आहे. उपकर्णधार रहाणे हा स्नायू दुखापतीमुळे (हॅमस्ट्रिंग) त्रस्त असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. इशांतच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. जडेजाचा उजवा हात दुखत आहे. कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रहाणेला दुखापत झाली. त्याच दिवशी इशांतच्या बोटावर जोरात चेंडू आदळला होता, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. मात्र, पहिल्या कसोटीमध्ये पाचव्या आणि अंतिम दिवशी संपूर्ण वेळ अजिंक्य मैदानावर उपस्थित होता. त्याने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना कर्णधारपद सांभाळले होते. स्नायू दुखावल्याची त्याने कुठलीही तक्रार केली नव्हती. तसेच सामन्यानंतरही अशी कोणती माहिती समोर आली नाही. कहर म्हणजे रहाणे फलंदाजीचा सराव करत असल्याचे फोटो बीसीसीआयने २ डिसेंबरला शेअर केले होते.

पाचव्या दिवशी पहिल्याच चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना ईशांतला दुखापत झाली, पण त्यानंतर त्याने दिवसभर क्षेत्ररक्षण केले. गोलंदाजीही केली. दुखापत झाली असती, तर दिवसभर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा धोका का पत्करला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पहिल्या कसोटीदरम्यान इशांतप्रमाणे जडेजालाही दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे जडेजाने दोन्ही डावात दमदार फलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात प्रभावी गोलंदाजी करताना संघाला विजयासमीप नेले. मग दुखापत कधी झाली? जडेजाचा हात खूप दुखत असून तो बॅटही उचलू शकत नाही, असे नाणेफेकीवेळी कर्णधार कोहलीने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -