Tuesday, May 7, 2024
HomeदेशLoksabha Election : महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात कमी मतदान; सतत येत आहेत अडथळे

Loksabha Election : महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात कमी मतदान; सतत येत आहेत अडथळे

आज सकाळी दहा वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला (Lok Sabha Election 2024) सुरुवात झाली. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, केरळ सहित १३ राज्यातील ८८ जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान होत आहे. मात्र, या मतदानादरम्यान महाराष्ट्रात काही ना काही अडचणी येत आहेत. गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला. तर हिंगोलीत ३९ मतदान केंद्रांवर मतदानासाठी अडथळा आला आहे.

हिंगोलीत ३९ मतदान केंद्रांवर पहिल्या दोन तासात ३९ बॅलेट मशीन आणि १६ कंट्रोल युनिट बदलण्यात आले. २५ ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या. सध्या या मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू आहे. सकाळच्या टप्प्यात तापमानाचा पारा कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे मतदानाचा टक्का थोडा घसरला आहे. हिंगोली ७.२३ टक्के मतदान झाले.

अमरावती, नांदेड, वर्धामध्येही ईव्हीएममध्ये बिघाड

अमरावतीच्या वडरपुरा भागातील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला. या केंद्रात तीन खोल्या आहेत. त्यापैकी खोली क्रमांत १ मधील ईव्हीएममध्ये बिघाड झालं. परिणामी इथलं मतदान थांबलं होतं. नांदेडच्या मतदान केंद्र ५ वरील ईव्हीएम मशीन बंद झालं. त्यामुळे गेल्या तासाभरापासून मतदान केंद्र बंद असल्याने मतदारांचा खोळंबा झाला होता. तर वर्ध्यातील कारंजामधील मतदान केंद्रातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता.

महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान?

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान झाले आहे. ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा – ७.१८ टक्के
अकोला – ७.१७ टक्के
अमरावती – ६.३४ टक्के
बुलढाणा – ६.६१ टक्के
हिंगोली – ७.२३ टक्के
नांदेड – ७.१३ टक्के
परभणी – ९.७२ टक्के
यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?

देशात दुसऱ्या टप्प्याच्या ८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झालं आहे, हे जाणून घेऊयात.

आसाम – ९.७१ टक्के

बिहार – ९.८४ टक्के

छत्तीसगढ – १५.४२ टक्के

जम्मू आणि कश्मीर – १०.३९ टक्के

कर्नाटक – ९.२१ टक्के

केरळ – ११.९८ टक्के

मध्यप्रदेश – १३.८२ टक्के

महाराष्ट्र – ७.४५ टक्के

राजस्थान – ११.७७ टक्के

त्रिपुरा – १६.६५ टक्के

उत्तर प्रदेश – ११.६७ टक्के

पश्चिम बंगाल – १५.६८ टक्के

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -