Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीयुवावर्ग हीच खरी देश आणि पक्षाची ताकद; भाजप नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन

युवावर्ग हीच खरी देश आणि पक्षाची ताकद; भाजप नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन

मालवण : युवकांनी जोशपूर्ण व आक्रमक शैलीने सतत काम करावे. तळागळात पोहचून जनतेत राहून काम करणारे युवक ही खरी पक्षाची ताकद आहे. पक्षासाठी, जनतेसाठी काम करा, व्यासपीठ तुमचेच असेल. भविष्यात संधी आहे, आपल्यातीलच युवक उद्या आपला देश आणि पक्ष पुढे नेणार आहेत, असे मार्गदर्शक प्रतिपादन भाजप नेते निलेश राणे यांनी युवा मोर्चा पदाधिकारी यांना केले.

दरम्यान, आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब बहुमताने विजयी होणारच आहेत. त्यात आपला युवा मोर्चाच्या वाटा सिंहाचा असावा. यासाठीही अधिक जोमाने तयारीला लागा. असेही आवाहन निलेश राणे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने गावागावात बूथ तिथे युथ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी बूथ रचना सक्षम होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने गेले काही दिवस भाजपा युवा मोर्चा मालवण तालुका अध्यक्ष मंदार लुडबे यांच्या माध्यमातून गावागावात भेटी देत संघटनात्मक बांधणी सुरू होती. त्यांचे एकत्रीकरण करून त्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कट्टा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला भाजपा भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी संबोधित केले. भाजपा युवा मोर्चा मालवण पदाधिकारी यांचे सर्वप्रथम कौतुक करताना एवढ्या कमी वेळात जास्तीत जास्त बूथ रचना तयार करून हा संवाद त्यांनी घडवून आणला यासाठी त्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. त्यामुळे युवा पिढीने आपली ताकद ओळखली पाहिजे जे तुम्ही मनापासून ठरवाल ते तुम्ही साध्य नक्कीच कराल, एवढी ताकद आपल्या युवा पिढीत आहे. आगामी काळात सत्ता आपलीच असणार. लोकांचे प्रश्न जाणून घ्या. त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणींना मदत करा. लोक तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास सामंत यांनी उपस्थित युवा वर्गास दिला.

बैठकीला भाजप नेते निलेश राणे, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांसह मामा माडये, संतोष साठविलकर, राजन माणगावकर, शेखर फोंडेकर, सतीश वाईरकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष राकेश सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, दया देसाई, स्वप्नील गावडे, जगदीश चव्हाण, चेतन मुसळे, सुमित सावंत, सुशील गावडे, मंदार वराडकर प्रथमेश गोसावी, तेजस म्हाडगूत, मंदार मठकर, युवामोर्चाचे सर्व बूथ अध्यक्ष व कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -