Monday, May 6, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : ...म्हणूनच संजय राऊत ईव्हीएमच्या नावाने नाक रगडतोय!

Nitesh Rane : …म्हणूनच संजय राऊत ईव्हीएमच्या नावाने नाक रगडतोय!

ज्याला साधा जाहीरनामा सांभाळता येत नाही, तो देशाचं नेतृत्व काय करणार?

नितेश राणे यांचा संजय राऊत व उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : ‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इंडिया अलायन्सला (INDIA Alliance) सरळसरळ आपला पराभव दिसू लागलेला आहे. आज मतदान होत आहे आणि वातावरण पूर्णतः मोदीमय झालं आहे. म्हणूनच संजय राऊत (Sanjay Raut) ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसला होता’, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. ईव्हीएमवर शंका घेणार्‍या संजय राऊतांवर आणि स्वतःचा जाहीरनामाही नीट सांभाळू न शकणार्‍या उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) नितेश राणे यांनी सणसणीत टीका केली.

नितेश राणे म्हणाले, ईव्हीएमच्या पूर्ण प्रक्रियेवर कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलं आहे. भारत देशात निवडणुका ईव्हीएमवरच होणार, हे कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे. ईव्हीएमवर आरोप करणारे कोणीही असो, त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं तर कोर्टाने दखल घेतली असती. त्यामुळे भांडुपमध्ये बसलेला देवानंद कितीही ईव्हीएमच्या नावाने भुंकत बसला तरी देशाच्या जनतेने ठरवलं आहे की, पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा आदरणीय मोदीजींनाच बसवायचं आहे आणि एनडीएला ‘४०० पार’ करुन द्यायचं आहे.

पुढे ते म्हणाले, काल जो उबाठाचा जाहीरनामा जाहीर झाला, त्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेला आपला जाहीरनामा नीट सांभाळता आला नाही. ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही, ते लोक देशाचं नेतृत्व करण्याची हिंमत कशी करु पाहतात? अशा नेत्याचे खासदार निवडून देऊन देशाचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं काही भलं होणार आहे का? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

जाहीरनामा नावाचा एक कागद उद्धव ठाकरेने काल प्रकाशित केला. जो उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकला नाही, ज्याने सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावलं, बाळासाहेबांचे विचार आणि पक्ष केवळ सत्तेच्या लाचारीसाठी त्याने गमावून टाकले, त्याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास नाही यावर परत एकदा ४ जूनला शिक्कामोर्तब होणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं चायनीज मॉडेल शिवसेना

आमच्यासमोर चोरलेली शिवसेना लढत आहे, या संजय राऊतांच्या टीकेवर नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर आधारलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील चायनीज मॉडेल शिवसेना असा थेट सामना आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

हे महिला सबलीकरणाची भाषा कशी करु शकतात?

ज्या वचननाम्याच्या मुख्य पानावर आदित्य ठाकरेचा फोटो आहे ते महिला सबलीकरणाची भाषा कशी करु शकतात? ज्याच्यावर दिशा सालियनवर गँगरेप करुन तिचा खून केल्याचा आरोप आहे, ज्या संजय राऊतवर डॉक्टर महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे, त्या लोकांच्या जाहीरनाम्यात जर महिला सबलीकरणाचा मुद्दा असेल तर लोकं त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

युटर्नचं नवं नाव उद्धव ठाकरे

संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी युटर्न घेतात, अशी टीका केली. यावर नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, युटर्नचं नवं नाव उद्धव ठाकरे आहे. म्हणून आता जिथे तुम्हाला युटर्न दिसेल, तिथे उद्धव ठाकरे असं नाव उच्चारतात. कारण त्याने त्याच्या कारकिर्दीत एकही दिेलेला शब्द पाळला नाही. तो सोमवारी वेगळं आणि बुधवारी वेगळं बोलायचा. त्यामुळे संजय राऊतने युटर्नची भाषा करु नये, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -