Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीBeed Water Crisis : धक्कादायक! पाणीटंचाईने घेतला महिलेचा जीव; कुटुंब पडले उघड्यावर

Beed Water Crisis : धक्कादायक! पाणीटंचाईने घेतला महिलेचा जीव; कुटुंब पडले उघड्यावर

बीड : एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या तर काही ठिकाणी वीज पुरवठ्याचा खंड अशा समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाचवेळी या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने तेथील नागरिकांना पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा समस्या पार करत असताना बीड जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यातील गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुरकासार तालुक्यातील गावांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बीड येथे दोन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा पायरीवरून पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना हिंगेवाडी या ठिकाणी घडली आहे. चंद्रकला दगडू फुलमाळी असं मृत महिलेचं नाव असून या महिलेवर तिचं संपूर्ण कुटंब चालवण्याची जबाबदारी होती. मात्र, तिचाच मृत्यू झाल्याने हिंगेवाडीतील फुलमाळी कुटुंब उघड्यावर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

हिंगेवाडी येथे राहणारी चंद्रकला दगडू फुलमाळी, वय ४० वर्ष ही महिला सकाळी पाणी आणायला गेली होती. दोन दिवसांपासून लाईट नसल्याने घरात पाणी नव्हते. यामुळे ती जवळच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन विहिरीतून वर येत असताना पायरीवरून तिचा अचानक पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली. सोबत असलेल्या चार वर्षाचा लहान मुलाने घडलेला हा प्रकार घरी येऊन सांगितला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली, महिलेला विहिरीतून बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये दाखल केले. यावेळी डॉ.पूजा मस्के यांनी चंद्रकला फुलमाळी यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. चंद्रकला फुलमाळी यांचे पती आजारी असल्याने संपूर्ण घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या महिलेच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निर्मूलनार्थ प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही राज्यातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -