Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीHealth: तुम्हाला नखे खाण्याची सवय आहे का? तर आजच सोडा ही सवय...

Health: तुम्हाला नखे खाण्याची सवय आहे का? तर आजच सोडा ही सवय नाहीतर…

मुंबई: बऱ्याच लोकांना नखे खाण्याची(nail biting) सवय असते. यावरून घरातील मोठी माणसेही ओरडत असतात. ही एक वाईट सवय आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की घरातील मोठी माणसे नखे खाण्यावरून का ओरडतात? नखे खाण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सतावतात.

नखे खाणे ही एक अशी सवय आहे जी रोखणे अतिशय कठीण असते. एका रिसर्चमध्ये सांगितले गेले आहे की जगातील ३० टक्क्यांपर्यंत लोकांना नखे खाण्याची सवय आहे. जाणून घेऊया या सवयीमुळे काय नुकसान होते ते…

नखे खाल्ल्याने नखामध्ये जमा झालेली घाण शरीरात जाते आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. हे इन्फेक्शन हळूहळू शरीरात पसरते. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या होतात.

नैसर्गिक वाढ थांबते

जर तुम्हाला सतत नखे खाण्याची अथवा कुरतडण्याची सवय असेल तर यामुळे नखांची नैसर्गिक वाढ थांबते. सतत नखे कुरतडल्याने त्यांच्या वाढीच्या पेशींना नुकसान होते आणि नखे वाढणे बंद होते.

फंगल इन्फेक्शनचा धोका

नखे खाल्ल्याने त्यातील जमा झालेले फंगस शरीरातून दुसऱ्या भागात जाते यामुळे फंगल इन्फेक्शन होते. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.

दातदुखीचा त्रास

नखे चावल्याने अथवा कुरतडल्याने दातांचा त्रास होऊ शकते. दातांतून रक्त येणे अथवा दात दुखीची समस्या सतावू शकते.

आतड्यांना होते नुकसान

नखे कुरतडल्याने त्यातील घाण शरीरात जाते. यामुळे पचनसंस्था आणि मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी असे त्रास संभवू शकतात.

नखे खाण्याची सवय सोडण्यासाठी टिप्स

१. जर तुम्हाला नखे खाण्याची सवय सोडायचे आहे तर माऊथ गार्डची मदत घेऊ शकता.

२. तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. काहींना खूप टेन्शनमध्ये असलं की नखे खाण्याची सवय असते.

३. तुम्ही हवं तर नखांना लिंबूचा रसही लावू शकता. यामुळे नखे तोंडात गेल्यास तुमच्या लक्षात येईल की नखे खाल्ली नाही पाहिजेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -