Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीSchool Admission : शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी हे वाचा!

School Admission : शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी हे वाचा!

महाराष्ट्रात ६६१ तर मुंबईत १८६ बेकायदेशीर शाळा, नवी मुंबईतही ५ शाळा अनधिकृत

नवी मुंबई : नवी मुंबईमधील (Navi Mumbai) शाळांमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणाऱ्या (School Admission) पालकांना नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) सावध केले आहे. राज्याची कोणतीही मान्यता नसलेल्या अनधिकृत अशा पाच शाळा नवी मुंबई शहरात सुरू आहेत व अशा शाळांमध्ये आपल्या मुलासाठी प्रवेश घेणे टाळा, असे पालिकेने म्हटले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. बेकायदा घोषित केलेल्या या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.

महानगरपालिकेने या शाळांमध्ये प्रवेश (School Admission) घेऊ नये असे सांगितले आहे. तसेच या शाळांमध्ये आधीच शिकत असलेल्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या शाळा योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत आहेत. त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.

या शाळांना, शिक्षण हक्क कायद्यानुसार परवानग्या मिळवा किंवा दंडात्मक कारवाईसाठी तयार राहा, अशा सूचना देणाऱ्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

दरम्यान याआधी डिसेंबर २०२३ मध्ये, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लेखी उत्तरात माहिती दिली होती की, महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या ६६१ शाळांवर कारवाई सुरू करण्यात आली असून खासगी संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हद्दीत सुरू असलेल्या १८६ बेकायदेशीर शाळांची माहिती त्यांच्या विभागाकडे असल्याची पुष्टीही केसरकर यांनी केली होती.

अनधिकृत घोषित केलेल्या शाळांची यादी

  • अल मोमिना स्कूल, बेलापूर.
  • इकरा इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ.
  • ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, सीवूड्स.
  • शालोम प्रायमरी स्कूल, तुर्भे.
  • इलिम इंग्लिश स्कूल. रबाळे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -