Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीBabanrao Dhakne : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

Babanrao Dhakne : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचं गुरुवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर (Ahmednagar) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

बबनराव ढाकणे यांचं पार्थिव पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -