Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीAccident news : भाजपाचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात

Accident news : भाजपाचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात

चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावला जीव

भंडारा : गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉ.परिणय फुके थोडक्यात बचावले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे हा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित केली जात आहे.

डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर साकोलीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

कसा झाला अपघात?

रात्री उशिरा डॉ. परिणय फुके लाखनी येथे परत येत असताना साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले. पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे ही धडक टळली. पण त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले.

या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सबंधित अज्ञात वाहन नंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले. दरम्यान हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -