Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीगुजरातच्या किनारपट्टीवर जप्त केला तब्बल १२ हजार कोटींचा ड्रग्ज साठा

गुजरातच्या किनारपट्टीवर जप्त केला तब्बल १२ हजार कोटींचा ड्रग्ज साठा

नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेमुळे ड्रग्ज साठा ताब्यात घेण्यात यश

अहमदाबाद : गुजरातच्या किनारपट्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत इराणहून गुजरातला आणला जाणारा २६०० किलो ड्रग्जचा साठा पकडला आहे. भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याची गुप्त सूचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्जची किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

इराणहून गुजरातला आणले जाणारे हे अमली पदार्थ तिथे पोहोचण्यापूर्वीच नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेमुळे ताब्यात घेण्यात यश आले आहे. नौदलाच्या आयएनएस टीईजी F-14 या जहाजाने अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे.

तस्करी करणा-या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेऊन त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांविषयी तसंच ड्रग्जच्या तस्करीविषयी सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे.

याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -