Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीMoto G Stylus 5G झाला लाँच, कमी किंमतीत दमदार फीचर्स

Moto G Stylus 5G झाला लाँच, कमी किंमतीत दमदार फीचर्स

मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन Moto G Stylus 5G लाँच केला आहे. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये आपला नवा फोन सादर केला आहे जो Samsung Galaxy S24 Ultra प्रमाणाचे एक स्टायलससह येतो. हा फोन ब्रांडच्या G सीरिजचा भाग आहे.

हा फोन विगन लेदर फिनिश आणि इन बिल्ट स्टायलससोबत येतो. स्टायलसच्या मदतीने तुम्ही नोट्स लिहू शकता. डूडल क्रिएट, फोटो एडिटसह अनेक कामे करू शकता.

Moto G Stylus 5G ची किंमत

मोटोरोलाचा हा फोन अमेरिकन बाजारात लाँच झाला आहे. याची किंमत ३९९.९९ डॉलर (साधारण ३३,४०० रूपये) आहे. हा अमेरिकेच्या प्रमुख शहरांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने यात दोन रंगांचे पर्याय दिले आहेत. कॅरेमल लाटे आणि स्कार्लेट वेवमध्ये लाँच केला आहे. दरम्यान, हा फोन भारतात लाँच होण्याची शक्यता कमी आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन?

Moto G Stylus 5G मध्ये ६.७ इंचाचा FHD+ pOLED डिस्प्ले मिळतो. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट, २.५ डी कर्व्हड ग्लास, १२०० nits पीक ब्राईटनेससोबत येतो. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. यात तुम्ही २टीबी पर्यंत मेमरी वाढवू शकता. हा हँडसेट अँड्रॉईड १४वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर , ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि Dolby Atmos सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात ५० MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर 13MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससोबत येतो. फ्रंटसाठी कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -