Tuesday, May 21, 2024
Homeमहत्वाची बातमीदेवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकाच्या पराभवावरील प्रतिक्रियांना दिले प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकाच्या पराभवावरील प्रतिक्रियांना दिले प्रत्युत्तर

भाजपच्या स्ट्राईक रेटचा केला पुनरुच्चार

छत्रपती संभाजी नगर: काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्लेषण करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपच्या स्ट्राईक रेटचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले, आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे.

कर्नाटक विधानसभा निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करू, ते करण्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको, असंही म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपविरोधी केलेल्या ट्वीटवर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -