Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीउपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून धनखड यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून धनखड यांना उमेदवारी

नवी दिल्ली (हिं.स.) : भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी धनखड यांच्या नावाची घोषणा केली.

राजधानी दिल्लीत शनिवारी झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चेअंती धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. याच बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जगदीप धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून मतदान ६ ऑगस्टला होणार आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी भाजपने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. यापूर्वी २०१७ मध्ये एनडीएने तत्कालीन केंद्रीय मंत्री वैकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन दिले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -