Friday, May 10, 2024
Homeक्रीडाIPL 2024CSK vs GT  : चेन्नईच्या वादळासमोर गुजरातचा धुव्वा, चेन्नईचा सलग दुसरा विजय

CSK vs GT  : चेन्नईच्या वादळासमोर गुजरातचा धुव्वा, चेन्नईचा सलग दुसरा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league) हंगामात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सने धमाकेदार कामगिरी केली. पहिल्यांदा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. सीएसकेने चेपॉक स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला ६३ धावांनी हरवले.

या सामन्यात गुजराच संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे आयपीएल २०२३मध्ये मिळालेल्या मोठ्या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी होती. मात्र दुर्देवाने त्याला असे करता आले नाही. आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये चेन्नईच्या संघाने गुजरातला ५ विकेटनी हरवत खिताब जिंकला होता. त्यानंतर आता दोन्ही संघ आमने-सामने आले होते.

या सामन्यात चेन्नईने टॉस हरत पहिल्यांदा फलंदाजी करताना २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्र्त्युत्तरादाखल गुजरातच्या संघाने ८ विकेट गमावत १४३ धावा केल्या. गुजरातसाठी साई सुदर्शनने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर ऋद्धिमन साहा आणि डेविड मिलर प्रत्येकी २१ धावा करून बाद झाले. गुजरातच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नई संघासाठी दीपक चाहर, मुस्तफिझुर रेहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या. तर मथीशा पथिराना आणि डॅरेल मिचेलने १-१ विकेट घेतली.

चेन्नईकडून शिवम दुबेने २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २३ बॉलमध्ये ५१ धावांचे सडेतोड खेळी केली. याशिवाय रचीन रविंद्रने २० बॉलमध्ये ४६ धावा ठोकल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४६ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -