Friday, May 10, 2024
Homeमहत्वाची बातमीकोरोना लसीकरण पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये आता 'फ्लोरोना'चे संकट

कोरोना लसीकरण पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये आता ‘फ्लोरोना’चे संकट

इस्रायल : आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लसी देणारा पहिला देश असल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये फ्लोरोना नावाच्या नवीन संकटाने डोकं वर काढले आहे. फ्लोरोनाचा अर्थ होतो कोरोना आणि इन्फ्लूएन्झाचा एकाच वेळी संसर्ग होणे. येथील व्हानेटन्यूज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी कोरोना आणि इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झालेली रुग्ण ही एक गरोदर महिला आहे. राबीन मेडिकल सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे. या महिलेचं लसीकरण झालेलं नसल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला कोरोना आणि इन्फ्लूएन्झा या दोन्हींची लस देण्यात आलेली नाही.

इस्रायमधील आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहे. या महिलेला फार त्रास होत नसला तरी मध्यम स्वरुपाची लक्षणं तिच्यामध्ये दिसत आहेत. या दोन्ही विषाणूंचा एकाचवेळी संसर्ग झाल्यास अधिक प्रमाणामध्ये प्रकृती खालावते का?, एकाच वेळी संसर्ग झाल्याने विषाणू अधिक घातक ठरतात का?, या सारख्या गोष्टींचा शोध सध्या संशोधकांकडून घेतला जातोय. आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यापूर्वीही अनेकांना अशाप्रकारे एकाच वेळी दोन विषाणूंचा संसर्ग झाला असावा मात्र त्याचं निदान न झाल्याने ही प्रकरण उजेडात आली नसतील.

मागील वर्षी गरोदर महिलांमध्ये फ्लूची फार प्रकरणं आढळून आली नाहीत, अशी माहिती रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ असणाऱ्या अरनॉन विझिन्टर यांनी दिली. मात्र मागील काही काळापासून फ्लू त्याचबरोबर करोनाचा संसर्ग झालेल्या गरोदर महिलांची संख्या वाढताना दिसत असून ही चिंतेची बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

गरोदर महिला रुग्णालयामध्ये दाखल होताना तिला ताप असेल तर तो नक्की कोरोनाचा संसर्ग आहे की इन्फ्लूएन्झा याचं निदान लवकर होत नाही. अशावेळेस या महिलांच्या चाचण्या केल्या जातात. यापैकी अनेक महिलांना श्वसनाचाच त्रास असल्याचं डॉक्टर म्हणतात.

फ्लोरोना हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट नसल्याचं नहल्ला अब्दुल वहाब यांनी सांगितले. वहाब हे कायरो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. फ्लोरोनाचा संसर्ग म्हणजेच एकाचवेळी दोन वेगवेगळ्या विषाणूंचा संसर्ग होणं हे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती अगदीच संपलीय किंवा नष्ट झाल्याचं निर्देशित करतं असं डॉक्टर सांगतात. एकाच वेळी दोन विषाणूंचा संसर्ग होत असल्यास रोगप्रतिकारशक्ती अगदी संपल्यात जमा असल्याचं म्हणता येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

इस्रायलमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता सरकारने आपल्या नागरिकांसाठी चौथ्या डोसची तयारी पूर्ण केली असून लसीकरणास सुरुवातही झाल्याची माहिती समोर येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -