Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीकोरोना, लॉकडाऊन त्यांचा आवडता विषय

कोरोना, लॉकडाऊन त्यांचा आवडता विषय

मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले

नागपूर : सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले नसते. चायना, कोरीया जपानमध्ये कोरोना सुरु झाला, तो निकष आपल्याकडे लावून विदर्भात अधिवेशन घेतले नसते. अजित पवारांना माहीत आहे की, कोविड आणि लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय आहे, असे खोचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. आज विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गाच्या उद्घाटनावरुन विरोधकांनी वाद घातला. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे हा महामार्ग होऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांना जमीनी देऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण माहीत आहे. काम करताना याचा आम्हाला फायदा होईल. मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे किती काळ होते हे सर्वांना माहीत आहे. विदर्भाला मुख्यमंत्रीपद किती काळ होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विदर्भाचा अनुशेष दुर करण्यासाठी मविआला न्याय देता आला असता. विदर्भाच्या बाबतीत सर्वांनाच संवेदना असावी. विदर्भाला काहीतरी द्यायला हवे. कालबद्ध पाऊले टाकण्याची इच्छाशक्ती हवी. सरकार म्हणून जबाबदारी पाळणार व काही तरी ठोस निर्णय घ्यायचे आहेत. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्वाचा आहे. विदर्भाचा विकास आम्ही केंद्रस्थानी मानतो. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाला. तो सुरू करुन उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा महामार्ग सुरू केला. विदर्भातील समृद्धी महामार्गामुळे दहा जिल्हे चौदा जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडले जातील. नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, चंद्रपूर अशा जिल्ह्यांना जोडत आहोत. मराठवाड्यात जालना-नांदेडलाही जोडत आहोत. इंटरस्टेटही हा मार्ग कनेक्ट करीत आहोत.

अजित पवार यांना २००४ मध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, संधी असतानाही शरद पवार यांनी अजित दादांना मुख्यमंत्री केले नाही, असा टोला गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हाणला. फडणवीस म्हणाले, आम्ही विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना मार्गी लावल्यात. अनेक उद्योग आणलेत. विदर्भात मदर डेअरी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलाला मिळाला. विदर्भात पतंजलीचा प्रकल्प जानेवारी महिन्यात सुरू होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -