Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीRashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र...

Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का! रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

चौकशीला वारंवार राहिल्या गैरहजर

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) मविआकडून (MVA) रामटेकमध्ये (Ramtek) काँग्रेसला (Congress) उमेदवारी मिळाल्याने ठाकरे गटाच्या (Thackeray Group) सुरेश साखरे यांनी अपक्ष उमेदवारीचा मार्ग पत्करला. त्यामुळे हा धक्का पचवत असतानाच मविआला आणखी एक धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचं जात वैधता प्रमाणपत्र (Caste validity certificate) रद्द करण्यात आलं आहे. जात पडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला.

रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला.

विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका आहे. मविआत काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याने त्यांची उमेदवारी नाकारली गेल्यास रश्मी बर्वे यांच्या पतीचं म्हणजेच श्यामकुमार बर्वे यांचं नाव वैकल्पिक उमेदवार म्हणून एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर होतं. त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

रश्मी बर्वे वारंवार चौकशीला राहिल्या गैरहजर

रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनविण्याकरिता जात पडताळणी समितीकडे खोटे दस्तावेज सादर केले व वैधता प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रांची पुनःश्च तपासणी करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल करण्यात आली होती. सुनील साळवे यांच्या तक्रारीवरून सामाजिक न्याय विभागाने पडताळणी समितीला नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बर्वे यांच्या अडचणी वाढल्या.

समितीने वेळोवेळी बर्वे यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु त्या समितीसमोर गैरहजर राहिल्या होत्या. अखेर समितीने त्यांच्या घराच्या दारावर नोटीस चिकटवून ही अखेरची संधी असल्याचेही म्हटले होते. यानंतरही रश्मी बर्वे चौकशीला उपस्थित न राहिल्याने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समितीने जाहीर केले आहे. यावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून त्यांनी निकाल राखून ठेवला आहे.

रश्मी बर्वे यांची उच्च न्यायालयात धाव

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी केल्यापासूनच त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -