Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीCancer: तरूणांमध्ये वेगाने वाढतोय कॅन्सर, दरवर्षी १५ लाखाहून अधिक रुग्ण

Cancer: तरूणांमध्ये वेगाने वाढतोय कॅन्सर, दरवर्षी १५ लाखाहून अधिक रुग्ण

मुंबई: डायबिटीजमंतर भारतात कॅन्सर वेगाने वाढत आहे. या जीवघेण्या आजाराला दरवर्षी मोठ्या संख्येने लोक बळी पडत आहेत. एका नव्या अभ्यासादरम्यान आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.

एका रिपोर्टनुसार देशात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, याचे बळी देशातील तरूण लोक पडत आहेत.

ही आकडेवारी भयानक

कमी वयाच्या लोकांमध्ये कॅन्सरचा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे खरंच चिंताजनक आहे. आकड्यांवर नजर टाकली असता २०२०मध्ये देशात १३.९ लाख कॅन्सरचे रुग्ण होते. यांची संख्या २०२५ पर्यंत १५.७ टक्क्यांवर पोहोचण्यची शक्यता आहे.

कमी वयात कॅन्सरचा धोका अधिक

भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर अधिक वेगाने वाढत आहे. यात कमी वयाच्या लोकांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिका आणि ब्रिटनव्यतिरिक्त इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी वयाच्या लोकांना वेगाने कॅन्सर होत आहे. याचे कारण बाकी देशांच्या तुलनेत या आजारांचे स्क्रीनिंग फार कमी असणे तसेच उशिराने होणे हे आहे.

भारतात कोणत्या प्रकारच्या कॅन्सरच्या केसेस अधिक

रिपोर्टनुसार महिलांमध्ये सर्व्हिक्स कॅन्सर अथवा सर्व्हायकल कॅन्सर तसेच ओव्हरीज कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे.

पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक आहे.

कोलन कॅन्सर अथवा आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक आढळते. या कॅन्सरचे ३० टक्के रूग्ण हे ५० वर्षाच्या आतील आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -