Friday, May 10, 2024
HomeदेशAyodhya Ram Mandir : जानेवारीत येणार श्री रामाची लाट!

Ayodhya Ram Mandir : जानेवारीत येणार श्री रामाची लाट!

जय श्रीराम! अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि देशात ‘न भूतो न भविष्यती’ राम महोत्सव होणार!

अयोध्या : अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना जानेवारीत होणार आहे. यावेळी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत संपूर्ण देशभरात चहु दिशेला ‘न भूतो न भविष्यती’ असा जल्लोषात दिमाखदार राम महोत्सव सोहळा होणार आहे.

श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसह रामलल्लाच्या अभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीची काल बैठक झाली. त्यात १४ ते २६ जानेवारीदरम्यान शुभ मुहूर्तावरील हा विधी अभूतपूर्व आणि अविस्मरणीय करण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २५ जानेवारीस प्राणप्रतिष्ठा करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानंतरचा सर्वात मोठा उपक्रम ठरेल. नववर्ष प्रारंभापासून राम लहर देशभरात उत्तर ते दक्षिण आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत असेल.

बैठकीत रूपरेषा, भाविकांच्या सुविधांवर चर्चा झाली. सोहळ्यास आध्यात्मिक केंद्रांचे प्रतिनिधी, प्रमुख मठ, आश्रम, तीर्थक्षेत्र यांचे प्रतिनिधी, नामवंत व्यक्ती, शहिदांचे नातेवाईक येतील. बौद्ध, जैन, शीख पंथांच्या देवस्थानांना निमंत्रण असेल. सर्व मंदिरांमध्ये हनुमान चालिसा, रामचरित मानस पठण होईल. दिवाळीसारखे प्रत्येक घरासमोर किमान पाच दिवे लावले जातील. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास म्हणाले, हा प्रसंग दुसऱ्या स्वातंत्र्य दिनासारखा आहे. ५०० वर्षांनंतर देव त्यांच्या जन्मभूमीत स्थापित होणार आहेत. यासाठी अयोध्येत ३२ हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत.

सोबत श्री रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील दोन, राजस्थानमधील एका प्रकारच्या संगमरवरापासून बनवली जात आहे. गणेश एल भट्ट, कर्नाटकातील योगिराज आणि राजस्थानचे सत्यनारायण पांडे श्री रामलल्लाची बालरूपी मूर्ती बनवत आहेत. त्यांचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

दरम्यान, प्राणप्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्न होण्यासाठी ट्रस्टने आतापासूनच महापूजेला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील पुरोहित चार वेद स्वाहाकार यज्ञ, श्रीमद भागवत पठण यज्ञ करत आहेत. महाराष्ट्रातील पुरोहित यज्ञ करत आहेत. अयोध्येतील स्थानिक ब्राह्मणही पूजा करत आहेत. इतर राज्यातील पुजारीही पूजेसाठी अयोध्येत येत आहेत. यामुळे हा महोत्सव डो्याचे पारणे फेडणारा असेल, अशी कार्यक्रमाची रूपरेषा या बैठकीत तयार करण्यात आली आहे. सर्वजण त्यादृष्टीने कामाला लागले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -