Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअक्षयसमोर आमिर, प्रभास

अक्षयसमोर आमिर, प्रभास

सुनील सकपाळ

सरत्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा कहर थोडा कमी झाल्याने थिएटर आणि नाट्यगृहे काही प्रमाणात सुरू झाली. मात्र, ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही सिनेमांचे लाँचिंग लांबणीवर पडले. तरीही पुढील वर्षीसाठी २० बिगबजेट चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात स्टार अभिनेता अक्षय कुमारसमोर आमिर खान, प्रभास, रणबीर कपूर आदींचे आव्हान असेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत ‘झुंड’ चित्रपटही नववर्षात प्रदर्शित होणार आहे.

२०२२ वर्षाची सुरुवात प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, अभिमन्यू सिंह, कृती सिंह आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. अक्षय कुमारचाच ‘पृथ्वीराज’ २१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘एक व्हिलन’ या चित्रपटाचा सीक्वल असलेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित होणार आहे. यात जॉन अब्राहम, दिशा पटनी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करत असून एकता कपूर चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘गंगूबाई काठियावाडी’देखील १८ फेब्रुवारीला सर्वत्र झळकणार आहे.

दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आली नसली तरी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. मार्चमध्ये होळीच्या निमित्ताने हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बोनी कपूर आणि डिम्पल कपाडियासुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. पुढील वर्षी एप्रिलमध्ये दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. १४ एप्रिल २०२२ रोजी आंबेडकर जयंती, तर १५ एप्रिल २०२२ ला गुडफ्रायडे आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी सुट्टी असल्याने निर्मात्यांनी याचा लाभ घेण्याचा विचार करून चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले आहेत. त्यानुसार १४ एप्रिलला वरुण धवनचा ‘भेडिया’, तर १५ एप्रिलला प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१ मे रोजीची सुट्टी आणि त्यानंतर ईदची सुट्टी लक्षात घेता अजय देवगनने ‘मेडे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात ठरवले. त्यानुसार त्याचा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होईल. पावसाळ्यातील मे, जून आणि जुलै महिन्यांमध्ये कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली नाही. मात्र प्रभासचा बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट १५ ऑगस्टच्या चार दिवस आधी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोन अभिनित ‘फायटर’ चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या अगोदर येणाऱ्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अक्षयचा ‘चौकार’

कुमार अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा सिनेमा जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर दिसणार आहे. अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट ४ मार्चला, तर आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट २४ ऑक्टोबरला सिल्व्हर स्क्रीनवर झळकेल.

प्रभासचे तीन चित्रपट

राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित ‘राधे श्याम’ चित्रपटात प्रभाससह पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. याशिवाय प्रभासचा आदिपुरुष हा सिनेमाही ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान, क्रिती सेनन आणि सनी कौशा आहेत. हिंदू धर्मग्रंथ रामायणावर या सिनेमाची कथा आधारित आहे, ज्यात प्रभास हा श्री राम यांची भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारणार असून क्रिती सेनन जानकीच्या भूमिकेत असेल.

रणवीर सिंगच्या दोन फिल्म्स

रणवीर सिंगचे दोन चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहेत. ‘जयेश भाई
जोरदार’ हा त्याचा पहिला चित्रपट आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा दुसरा चित्रपट आहे. दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.

आमीर बनला ‘लाल सिंह चड्ढा’

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खान आणि करिना कपूर यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमासुद्धा यंदा रिलीज होणार आहे. बैसाखीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ एप्रिल २०२२ रोजी ‘लाल सिंह चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -