Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीAjit Pawar VS Amol Kolhe : हिंमत असेल तर अमोल कोल्हेंनी 'त्या'...

Ajit Pawar VS Amol Kolhe : हिंमत असेल तर अमोल कोल्हेंनी ‘त्या’ भूमिकेबद्दल सांगावं!

…तर काँग्रेसवाले अमोल कोल्हेंचा प्रचार करतील का?

अजित पवारांनी पुन्हा एकदा साधला अमोल कोल्हेंवर निशाणा

शिरुर : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधारी पक्षाला साथ दिल्यांनतर शरद पवार (Sharad Pawar) गटातील खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना एक ओपन चॅलेंज दिलं होतं. शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असं ते म्हणाले होते. शिरुरमध्ये कोल्हेंविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची लढत पाहायला मिळणार आहे. यासाठी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत असलेल्या आढळराव पाटलांनी काल अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना उद्देशून म्हटले की, विद्यमान खासदार हे डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहेत. ही अशा प्रकारची डायलॉगबाजी मालिकेत, चित्रपटात शोभून दिसते. पण, ही डायलॉगबाजी जनतेसमोर कामी येत नाही असा टोलाही पवार यांनी लगावला.

…तर काँग्रेसवाले अमोल कोल्हेंचा प्रचार करतील का?

पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, त्यांचे कार्य घराघरात पोहोचवले अशी साद घालतात आणि मते मागतात. पण, २०२२ मध्ये तुम्ही एका चित्रपटात नथुरामची भूमिका केली होती हेदेखील सांगा. फक्त सोयीच्या असलेल्या भूमिकांबद्दल का सांगता? असा टोला अजित पवार यांनी लगावला. नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचा प्रचार करणार का, असा सवालही त्यांनी केला.

तुम्हाला उपलब्ध होणारा खासदार हवा…

राजकारण हा आपला पिंड नसल्याने ते आपले काम नाही, असे सांगणारे आता निवडणुकीला उभे राहिले आहेत, असा अप्रत्यक्ष टोलाही अजित पवार यांनी लगावला. ते म्हणाले, आढळराव-पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आणि कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची तुलना करावी. आढळरावांची ही घरवापसी आहे, तर तुमचे पक्षांतर झालेले आहे. मतदारांना उपलब्ध होणारा खासदार हवा आणि आढळराव हे लोकांसाठी उपलब्ध असतात, असंही पवार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -