Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीबेजबाबदार खासदार राहुल गांधींना वायनाडचे लोक कंटाळले!

बेजबाबदार खासदार राहुल गांधींना वायनाडचे लोक कंटाळले!

परदेशात फिरणारे राहुल गांधी वायनाडला टुरिस्ट व्हिसावर येतात

भाजपा उमेदवार सुरेंद्रन यांची राहुल गांधींवर टीका

केरळ भाजपाचे अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. यंदा राहुल गांधी पर्यटक व्हिसावरून येत असल्यामुळे ते वायनाडमधली लोकसभेत पराजित होत असल्याचे के सुरेंद्रन यांनी सांगत राहूल गांधीवर खोचक टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना “राहुल गांधी देशभर आणि परदेशात फिरतात. ते वायनाडला टुरिस्ट व्हिसावर येतात, पण मी येथील स्थानिक नागरिक आहे आणि माझ्याकडे कायमस्वरूपी व्हिसा आहे” असे केरळ भाजपाचे अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी सांगितले.

के सुरेंद्रन यांचा दावा

के सुरेंद्रन यांनी दावा केला, “वायनाडच्या लोकांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना संधी दिली होती, पण त्यांनी काहीही केले नाही. वायनाडचे लोक राहुल गांधींना कंटाळले आहेत. अशा स्थितीत ते यावेळी जिंकणार नाही. असा दावा के सुरेंद्रन यांनी केला आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. ते अमेठीमधून स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले होते, परंतु वायनाडमधून त्यांनी मोठा विजय नोंदवला होता. यावेळीही काँग्रेसने राहुल गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे.

के सुरेंद्रन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत ते बेजबाबदार खासदार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी वायनाडमध्ये किती वेळा आले आणि इथे काय विकास झाला. वायनाडमधील २० टक्के लोक अनुसूचित जमाती श्रेणीतील आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी काय केले? असा प्रश्न के सुरेंद्रन यांनी केला आहे.

 

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -