Wednesday, June 26, 2024
Homeमहत्वाची बातमीशेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तर बँकेवर गुन्हा दाखल करणार....

शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तर बँकेवर गुन्हा दाखल करणार….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तंबी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांना थेट तंबीच दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शेत शिवार योजना, शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज, आणि बँकातून दिल्या जाणाऱ्या कर्जावर भाष्य केले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपचे सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटासमोर खचून न जाता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये. तसेच आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून अॅग्रीकल्चर फिडरचा सोलरिझेशन करण्यात येत आहे. त्याची सुरुवात २०१८ साली करण्यात आली. मध्यंतरी ही योजना कागदावर होती मात्र आता ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नव्या योजनांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर घेण्यात येणार असून एकरी ५० हजार रुपये प्रतिवर्षी जमीन तीस वर्षाकरिता घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी कर्जाकरिता सिबिलची अट लागू होत नाही हे शॉर्ट टर्म कर्ज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करा अशा सूचना देणार असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार कायम उभा असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कृषीकर्ज न देणाऱ्या बँकांना धारेवर धरत सांगितले की, आता पुन्हा एकदा सांगतो आहे की, शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देणार आहे. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे बँकांना तंबीच दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -