Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीThackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा धक्का! बबनराव घोलप यांचा मुख्यमंत्र्यांच्या...

Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा धक्का! बबनराव घोलप यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश

उद्यापासून बबनराव गद्दार होतील; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) केलेल्या बंडाला वर्ष होऊन गेल्यानंतरही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कमी व्हायचं नाव घेत नाही. आजवर अनेक कार्यकर्ते, नेते व मंत्र्यांनी ठाकरे गट (Thackeray Group) सोडून शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे शिवसेना अधिकाअधिक बळकट तर ठाकरे गट कमकुवत बनत चालला आहे. त्यातच आज पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह माजी आमदार संजय पवार आणि आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बबनराव घोलप यांनी आम्हाला तिकडचे काही अनुभव सांगितले. आमचेही तसेच काही अनुभव होते. आता त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा दाखवून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता, त्यांच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका बोलून दाखवली. त्यांनी याअगोदरच निर्णय घ्यायला हवा होता. पण उशीरा का होईना, त्यांनी योग्य निर्णय घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोलप यांचे स्वागत करत असताना उबाठा गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “बबनराव घोलप आमच्यात आल्यामुळे उद्यापासून त्यांना कचरा असे संबोधले जाईल. त्यांना गद्दर म्हटले जाईल.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मिलिंद नार्वेकरांचं ऐकून मला बाहेर काढलं : बबनराव घोलप

दरम्यान, बबनराव घोलप यांनी ठाकरे गट सोडत असताना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली. “मिलिंद नार्वेकर कोण आहेत? त्यांचे ऐकून मला पक्षातून बाहेर काढले. नार्वेकरांमुळे अनेकजण पक्ष सोडून गेले आहेत. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवला. मात्र मिलिंद नार्वेकर यांचे ऐकून मला अचानक बाजूला सारण्यात आले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा घेऊन पुढे जात आहेत. यापुढे त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे. जर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, तर त्यांनाही सोडेन”, अशी प्रतिक्रिया बबनराव घोलप यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -