Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीLoksabha Election 2024: नाव एकाचं तर फोटो दुसऱ्याचा! मतदारयादीत मोठा घोळ

Loksabha Election 2024: नाव एकाचं तर फोटो दुसऱ्याचा! मतदारयादीत मोठा घोळ

मतदारांचा तीव्र संताप!

नागपूर : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर आली असताना मतदारयाद्यांमध्ये (Voter List) प्रचंड घोळ झाल्याच्या घटना घडत आहेत. फोटो एकाचा तर त्यासमोर भलत्याचेच नाव दिसून येत आहे. असा प्रकार मतदारयादीत आपले नाव बघायला गेलेल्या मतदात्यांना दिसून आला. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वॉर्डातील मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदारांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

निवडणुकीत मतदारयादी निवडणूक ओळखपत्रासह इतर काही आवश्यक शासकीय ओळख देणारा पुरावा मतदान करताना वापरता येतो. तशी मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र मतदारयादीतच चुकीचा फोटो व दुसऱ्याचे नाव आले असल्याने तारांबळ उडाली आहे.

शहरातील समाजसेवक हाजी मोहम्मद अशरफ, त्यांचे बंधू मोहम्मद सलीम व परिवारातील सदस्यांच्या फोटोखाली इतर दुसऱ्यांचे नाव आल्याचा प्रकार मतदारयादीतून पुढे आला आहे. दुसरीकडे त्यांचा फोटो आणि त्यांचे योग्य नावसुद्धा आहे. अर्थात दोन वेळा मतदारयादीत त्यांचा फोटो वापरला गेला. त्यामुळे इतरही मतदार आता आपले नाव मतदारयादीत फोटोसह तपासत असल्याचे चित्र आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -