Tribute To Sachin Tendulkar

सचिन, तुला लाख लाख धन्यवाद!

SACHIN

एक छान घर आहे, त्यात राहणारं कुटुंब सगळ्या बाबतीत सुखी आहे. घरात इतर अत्यंत कर्तबगार सदस्यही आहेत आणि शिवाय एक थोरला भाऊ आहे. अत्यंत गुणी आणि धीरगंभीर. त्याने घरातल्या सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. सुखाच्या क्षणी तो असल्याची जाणीव घरच्यांना आहे, पण कधी त्या घरावर संकट आलं की, तो लहानांना आपल्या पंखांखाली घेतो, मोठय़ांना धीर देतो. […]

सचिन भारतीय असल्याचा अभिमान!

sachin_tendulkar

सचिनला मी शारदाश्रम शाळेत एकत्र येण्याआधीपासून ओळखत होतो, कारण तेव्हा तो शिवाजी पार्कवर खेळायचा. तेव्हा मी शिवाजी पार्कवर माझे आधीचे प्रशिक्षक अण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायचो. मात्र त्या वेळी सचिनच्या फटकेबाजीने शिवाजी पार्कवरही त्याला पाहायला गर्दी व्हायची हे मला आठवते. तेव्हापासूनच तो प्रसिद्ध होता असे मी म्हणेन.

अजि म्या (क्रिकेटचा) देव पाहिला!

sachin tendulkar

‘सचिन’मधील संस्कारांचा मागोवा घ्यायचा तर त्याचं संपूर्ण नाव उच्चारले तरी पुरेसं आहे. सचिन रमेश तेंडुलकर. रमेश तेंडुलकर यांच्याकडून सौजन्याचा वारसा त्याला मिळाला. रमेश तेंडुलकर माझे शिक्षक आणि १९७२ नंतर ज्येष्ठ सहकारी.

 

माऊंट एव्हरेस्ट

sachin-tendulkar

फक्त सचिन. सचिन एके सचिन हा एकोणीस वर्षाचा शिरस्ताच जणू. वर्षानुर्वष कोटय़ावधी भारतीयांच्या आयुष्याचा तो अविभाज्य भग बनून राहिलाय. कसोटी क्रिकेटच्या सर्वोच्च पदावर विराजमान असणारा हा ‘एकमेवाद्वितीय’ म्हणजे एक वेगळं रसायन असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येतो.‘वन मॅन आर्मी’चं व्यक्तित्व त्याच्या एकेका खेळीसरशी फुलत गेलंय. सचिनच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या अद्वितीय कर्तृत्वाला नम्र कुर्निसात.

सचिन ज्याचा त्याचा

Sachin Tendulkar

सचिनचे बालपण, क्रिकेट कारकीर्द आणि तसेच त्याच्या अन्य (करार इत्यादी) बाबींवर खूप काही लिहिले जाते. तसेच बोलले जाते. मात्र चाहत्यांना भावलेला सचिन खूपच ‘ग्रेट’ बनायला हवा. मुळात क्रिकेटपटूंवर प्रेम करण्याची ही लोकांची पहिलीच वेळ नाही. भारताचा विचार केल्यास विक्रमादित्य सुनील गावस्कर, अष्टपैलू कपिलदेव निखंज, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर अशा अनेक क्रिकेटपटूंचा मोठा चाहता वर्ग आहे. […]

त्रिमूर्ती इफेक्ट

Sachin-Tendulkar-World-

सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकीर्दीतली शेवटची मालिका सध्या सुरू असताना, बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथनच्या कारकीर्दीतली कदाचित सर्वाधिक महत्त्वाची लढत एव्हाना चेन्नईत सुरू झालीये. लिअँडर पेस टेनिससारख्या शारीरिक कस लावणा-या खेळात चाळीशीनंतरही सक्रिय आहे आणि जिंकतही आहे. चाळीशी हे या तिघांना जोडणारं समान सूत्र आहे. आनंद लवकरच म्हणजे डिसेंबरमध्ये ४४ वर्षाचा होईल. सचिन आणि पेसनं या वर्षीच चाळीशी […]

मी अडवले क्रिकेटच्या देवाचे चौकार!

sac

शिवाजी पार्क हे अनेक नररत्नांच्या घडवणुकीचे साक्षीदार आहे. याच शिवाजी पार्कच्या मातीत खेळून वाढलेल्यांना इथल्या अनेक थोरामोठय़ांचा सहवास लाभला. त्यापैकी बाळासाहेब आणि सचिन ही दोन रत्ने याचि देही याचि डोळा आणि तीसुद्धा जवळून पाहण्याचे भाग्य माझ्यासारख्या सामान्याला लाभावे, यातच सारं काही आलं. बाळासाहेबांशी बोलण्याचा, भेटण्याचा योग राजकीय पत्रकारिता करताना आला. पत्रकारितेत काम करता करता एका […]

पोकळी भरायला वेळ लागेल!

ss13

सचिन तेंडुलकर हा एक महान क्रिकेटपटू आहे. आता त्याच्या निवृत्तीमुळे जागतिक क्रिकेटचे नुकसान होईल असे बोलले जाते. त्यात थोडय़ा प्रमाणात सत्य आहे. त्याचे कारण सचिनने खेळाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले ते याआधी कोणालाच जमले नाही. सचिनची कारकीर्दच अप्रतिम आहे. त्याबद्दल बोलावे तितके कमी आहे. मात्र शेवटी खेळ थांबत नाही हेदेखील तितकेच खरे आहे.

अजूनही आठवतो लहानगा सचिन!

ss8

भारताने १९८९मध्ये केलेल्या पाकिस्तान दौ-यातील सचिन तेंडुलकर अजूनही मला आठवतो. त्या वेळी त्या अवघ्या १६ वर्षाच्या मुलाला पाहून सर्व संघसहका-यांना एक वेगळेच टेन्शन आले होते. त्यातच पाकिस्तानात खेळणे हे कोणत्याही महान क्रिकेटपटूसाठी कठीण बाब असते. त्यामुळे अशा संघाविरुद्ध त्यांच्याच देशात इतक्या लहान वयात कसोटी पदार्पण करणे ही छोटी बाब नव्हती. त्या वेळी त्याचे वय लहान […]

सचिनप्रेमींचा फेस्टिव्हल

Sachin Tendulkar

एक खेळाडू अख्ख्या जगाला कसं काय ‘वेड लावू’ शकतो, याचा विचार केल्यावर असं जाणवतं की खेळाडू अनेक आहेत, पण प्रत्येकाला ‘आपला’ वाटणारा खेळाडू होणं सगळ्यांना जमतंच असं नाही. कर्तृत्वाची जाणीव असूनसुद्धा ‘ते’ सचिन तेंडुलकर असं म्हणण्यातल्या औपचारिकतेपेक्षा ‘आपला सच्चू’, ‘तेंडल्या’ अशा नावांनी संबोधणं त्याच्या ‘फॅन्स’ना अधिक आवडतं. मुंबईकरांना या आपल्या लाडक्या सचिनने विविध खेळांदरम्यान वापरलेल्या […]

सचिन ‘न भूतो न भविष्यति’ असा

sachin-tendulkar

दरवर्षी येणारी १४ नोव्हेंबर ही तारीख भारतीयांच्या लक्षात असते ती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि त्यानिमित्त होणारा बालदिन.

 

१६व्या वर्षी तो कसोटी खेळेल असं वाटलं नव्हतं!

sachin tendulkar and ajit tendulkar

१६व्या वर्षी सचिन कसोटी क्रिकेट खेळू लागेल आणि विक्रमांची इतकी शिखरं सर करेल असं आमच्या कुटुंबात कुणालाही वाटलं नव्हतं, असं सचिनचा थोरला भाऊ अजित सांगतो.

 

 

सचिननंतर काय..?

sachin tendulkar

विख्यात कवी पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ कादंबरीमध्ये लच्छी नामक मुलीची खूप मनोवेधक कहाणी सांगितली आहे. लच्छी आणि मोर ही रूपके वापरून पु. शि. आपल्याला सुचवितात की, ‘तुम्हाला मोर पाहिजे असेल तर तुम्ही स्वत:च मोरस्वरूप होऊन गेले पाहिजे.’ सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी त्या लच्छीच्या मोरप्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि ओजस्वी. आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या […]