बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर...
नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. हिंदी भाषकांना मारताय, उर्दू बोलणाऱ्यांना मारुन दाखवा, असं आव्हान निशिकांत दुबे यांनी दिले. तसेच मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत. दहशतवाद्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, हे हिंदीवरुन अत्याचार करतायत, "आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. महाराष्ट्राबाहेर चला. तुम्ही जर बॉस आहात, तर बिहारला चला. उत्तर प्रदेशला चला, तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू", अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी ठकरे बंधूंवर केली. निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना होत असलेल्या मारहाणीवर भाष्य केले. त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना माहीममध्ये जाऊन उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असे आव्हानही दिले.
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत. ठाकरे बंधू ...
मनपाच्या निवडणुकांसाठी घाणेरडं राजकारण सुरु
आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे. निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रीयनांविरुद्ध गरळ ओकल्याचे पाहायला मिळाले. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं निशिकांत दुबे म्हणाले. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला.
तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात -निशिकांत दुबे
तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. "तुम्ही काय म्हणत आहात की, मराठी बोलावं लागले? कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. टाटाने तर पहिला कारखाना बिहारमध्ये बनवला. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुमच्याकडे कोणता उद्योग आहे?", अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी केली. "खाणी आमच्याकडे आहेत. झारखंडकडे आहेत. मध्य प्रदेशकडे आहेत. छत्तीसगडकडे आहेत. ओडिशाकडे आहेत. तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत? रिलायन्सनेही रिफायनरी गुजरातमध्ये सुरू केली आहे. सर्व उद्योग मग सेमी कंडक्टरचा उद्योगही गुजरातकडे येत आहेत", असे निशिकांत दुबे मराठी विरुद्ध हिंदी वादावर बोलताना म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर...
बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही खरंच वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आमच्या पैशावर जगतायत. सगळे उद्योग गुजरातमध्ये येतायत. हिंमत असेल तर तुम्ही तेलगू लोकांना पण मारा, असं निशिकांत दुबे म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे, असं निशिकांत दुबेंनी सांगितले. निशिकांत दुबेंच्या या आव्हाननंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






