Friday, April 26, 2024
Homeहवामान महाराष्ट्रअतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सुमारे १,७०० गावांना बसला असून, सुमारे ३ लाख ७८ हजार ७५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.

दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर तब्बल ६ लाख २१ हजार ६९४ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५,३३,३८४ शेतकरी बाधित झाले आहेत. तर २ लाख ९८ हजार ८६१.१७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून १,५७० गावे बाधित झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोली ८५,६०० शेतकरी बाधित झाले आहेत, तर ७६ हजार ७७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ६२ गावे बाधित झाली आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर परभणी असून १,५०० शेतकरी बाधित, १ हजार २०० हेक्टर जमिनीचे नुकसान, तर ३ गावे बाधित झाली आहेत. चौथ्या क्रमांकावर लातूरमध्ये ७७५ शेतकरी बाधित, १ हजार ६४०.५७ हेक्टर जमिनीचे नुकसान, ८ गावे बाधित झाली आहेत.

त्यापाठोपाठ जालन्यात ३७७ शेतकरी बाधित, २५५.७४ हेक्टर जमिनीचे नुकसान, तर एक गाव बाधित झाले आहे. बीडमध्ये ५८ शेतकरी बाधित, २६.८० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून एक गाव बाधित झाले आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील नुकसान नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -