Measles outbreak

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत शुक्रवारी ८ नवीन गोवरच्या (measles) रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण रुग्णांचा आकडा २६० वर गेला आहे. गेल्या तीन दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णवाढ आहे. दरम्यान गोवरचे हॉटस्पॉट वाढत असून आजपर्यंत २९ ठिकाणी उद्रेक झाला आहे.

गोवरला आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहेच. त्यासोबत पालिकेने रुग्णालयांना देखील गोवर रुग्णांच्या उपचारात काही कमी पडू नये म्हणून सुविधा दिल्या आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सगळ्यांची पालिकेने तयारी केली आहे.

आतापर्यंत पालिकेने मुंबईतील ४८,७३,७३६ घरांचे सर्वेक्षण केले असून ३८३१ संशयित रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे १८०२ अतिरिक्त लसीकरण सत्रे राबवली असून १०,७२८ जणांचे लसीकरण झाले आहे. सध्या ३१ रुग्ण उपचाराकरिता रुग्णालयात दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here