प्रत्येक पूजन कर्मामध्ये दिवा लावणे अनिवार्य प्रथा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो. दिवा लावून आरती केली जाते. त्यानंतर पूजा पूर्ण होते. दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

तेलाचा दिवा कोठे ठेवावा : पूजा करताना देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.

दिव्यासाठी कोणत्या वातीचा उपयोग करावा : तुपाच्या दिव्यासाठी पांढ-या रूईच्या वातीचा उपयोग करावा. याउलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते.

दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य करावा.

शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदा
शत्रू बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।

या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ : शुभ आणि कल्याण करणा-या आरोग्य आणि धनसंपदा देणा-या, शत्रू बुद्धीचा नाश करणा-या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणा-या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. पूजा-पाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते. आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धन-संपत्तीमध्ये वृद्धी होते.